Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'या' पोस्टमुळे राहुल-निधीच्या नात्याला वेगळे वळण!

आयपीएल सीजन ११ मध्ये किंग्स इलेवन पंजाबसाठी उत्तम खेळी करणाऱ्या केएल राहुलचे नाव हॉट बॉलिवूड अभिनेत्री निधी अग्रवालसोबत जोडले गेले.

'या' पोस्टमुळे राहुल-निधीच्या नात्याला वेगळे वळण!

मुंबई : आयपीएल सीजन ११ मध्ये किंग्स इलेवन पंजाबसाठी उत्तम खेळी करणाऱ्या केएल राहुलचे नाव हॉट बॉलिवूड अभिनेत्री निधी अग्रवालसोबत जोडले गेले. मुन्ना मायकल फेम अभिनेत्री निधी अग्रवाल आणि क्रिकेटर केएल राहुल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांना रेस्टॉरन्टमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले. त्याचबरोबर स्टेडिअममध्ये त्याला चिअरअप करण्यासाठीही निधी उपस्थित होती. त्यामुळे या दोघांच्या अफेअरची जबरदस्त चर्चा होती. 

या पोस्टमुळे नाते वेगळ्या वळणावर

पण निधीच्या एका पोस्टने या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम लावला. निधीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. यात ती राहुलला शुभेच्छा देत आहे. शुभेच्छा देताना निधीने लिहिले, ऑल द बेस्ट ब्रो. निधीच्या चीअरअप पोस्टनंतर टीम इंडियाला देखील पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे युजर्स तिची खिल्ली उडवत आहेत. 

fallbacks

नात्याबद्दल निधी म्हणते...

यापूर्वीही निधीने एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही दोघं एकमेकांना डेट करत नसून फक्त चांगले मित्र आहोत. निधी एक मॉडेल असून टायगर श्रॉफ स्टारर सिनेमा मुन्ना मायकल या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. पण या सिनेमाला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळाला.

इंग्लंडमध्येही डेट करत असल्याची चर्चा

सध्या टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. निधी अग्रवाल देखील इंग्लंडमध्ये आपल्या साऊथ इंडियन सिनेमाचे शूटिंग करत आहे. त्यामुळे इंग्लंडमध्येही हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. लंडनमध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत के एल राहूल डेटवर

Read More