Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

कोलकातासाठी खुशखबर! जगातल्या नंबर 1 बॉलरची टीममध्ये एन्ट्री

कोलकातासाठी खुशखबर! जगातल्या नंबर 1 बॉलरची टीममध्ये एन्ट्री

कोलकातासाठी खुशखबर! जगातल्या नंबर 1 बॉलरची टीममध्ये एन्ट्री

मुंबई: आयपीएलच्या सुरुवातीला कोलकाता टीमने दणक्यात सुरुवात केली होती. आता कोलकाता टीममध्ये धडाकेबाज खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे टीमला एक बळ मिळणार आहे. कोलकाताची ट्रॉफी मिळवण्यासाठी वाट सोपी होणार आहे. 

हळूहळू बाकीचे खेळाडू आयपीएलमध्ये दाखल होत आहेत. आयपीएलमध्ये या खेळाडूच्या एन्ट्रीनं अजून सामन्याची रंगत वाढणार आहे. चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून लवकरच पॅट कमिन्सन टीममध्ये सहभागी होणार आहे.

कोलकाताने तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. आता टीमची ताकद वाढवण्यासाठी घातक बॉलरची टीममध्ये एन्ट्री झाली आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स लवकरच खेळताना दिसणार आहे. तो  एप्रिलला भारतात आला आणि तो क्वारंटाइनमध्ये होता. 

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज 6 एप्रिलपासून कोलकाता टीममधून खेळणार आहे. कमिन्स गेल्या 5 वर्षांपासून कोलकाताचा भाग आहे. KKR चा पुढील सामना 6 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स सोबत आहे. या सामन्यात कमिन्स संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसू शकतो. 

कमिन्ससाठी प्लेइंग इलेव्हनमधून कोणाला बाहेर काढणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. टीम खूप चांगली कामगिरी करत आहे. सगळे खेळाडू आपलं 100 
टक्के योगदान देत आहेत. त्यामुळे प्लेइंग इलेव्हन निवडणं आता डोकेदुखी ठरू शकतं असं हेडकोच मॅक्क्युलम म्हणाले. 

मेगा ऑक्शनमध्ये कमिन्सला 7.25 कोटी देऊन टीममध्ये घेतलं. आयपीएल 2020 मध्ये त्याच्यावर 15.50 कोटी फ्रान्चायझीने खर्च केले होते. यावेळी अर्ध्या किंमतीमध्ये त्याला टीममध्ये घेतलं आहे. 

कोलकाता टीम : 
श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंह, शेल्डन जॅक्सन, एरोन फिंच, सॅम बिलिंग्स, प्रथम सिंह, रमेश कुमार, बाबा इंद्रजीत, अभिजीत तोमर, सुनील नरेन, आंद्रे रसेल, पॅट कमिंस, मोहम्मद नबी, अनुकूल रॉय, नितीश राणा, शिवम मावी, चमिका करुणारत्ने, अमान खान, वरुण चक्रवर्ती, अशोक शर्मा, उमेश यादव, रशिक डार, टिम साउदी.

Read More