Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

DC vs KKR : कोलकाताच्या वादळासमोर दिल्ली भूईसपाट, 106 धावांनी विजय मिळवत पाईंट्स टेबलच्या टॉपवर

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्सने ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत पाईंट्स टेबलच्या अव्वल स्थानी (IPL points table) झेप घेतली आहे. 

DC vs KKR : कोलकाताच्या वादळासमोर दिल्ली भूईसपाट, 106 धावांनी विजय मिळवत पाईंट्स टेबलच्या टॉपवर

DC vs KKR,  IPL 2024 : विझागच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या आयपीएलच्या 16 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 106 धावांनी पराभव (Delhi Capitals vs Kolkata Knight Riders) केला. कोलकाताने सुनील नरेनच्या (Sunil Narine) वादळी खेळीच्या जोरावर आयपीएलच्या इतिहासातील (2nd Highest Total in IPL) दुसरी मोठी सर्वोच्च धावसंख्या उभी केली होती. सुनील नरेन याने 39 बॉलमध्ये 7 फोर अन् 7 सिक्सच्या जोरावर 85 धावांची खेळी केली होती. तर अंगक्रिश रघुवंशी (Angkrish Raghuvanshi) याने 19 बॉलमध्ये 41 धावा केल्या. तर रिंकू सिंगने 8 बॉलमध्ये 26 धावा करत कोलकाताला 272 धावांवर पोहोचवलं होतं. मात्र, कोलकाताने दिलेलं 273 धावांचं आव्हान पार करताना दिल्लीची फलंदाजी धावसंख्येच्या प्रेशरसमोर ढेपाळली. कोलकाताने सामना आरामात जिंकला अन् सलग तीन विजयासह पाईंट्स टेबलच्या अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

सामना जिंकण्यासाठी दिल्लीसमोर डोंगराऐवढं आव्हान होतं. त्याला उत्तर देताना डेव्हिड वॉर्नर अन् पृथ्वी शॉ यांची जोडी जमली नाही. दोघंही लवकर बाद झाले. त्यानंतर आलेल्या मिशेल मार्श आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून अभिषेक पोरेल यांना भोपळा देखील फोडता आला नाही. मात्र, ऋषभ पंत नडला. ट्रिस्टन स्टब्स आणि पंतने अर्धशतक ठोकलं. पंतने 55 धावांची खेळी केली, तर ट्रिस्टन स्टब्स याने 54 धावा केल्या. या दोन्ही खेळाडूंची विकेट गेल्यानंतर दिल्लीचा संघ ढेपाळला. 

कोलकाताने दिल्लीच्या एनरिक नॉर्टजेला 4 ओव्हरमध्ये 59 धावा चोपल्या. एनरिक नॉर्टजेने तीन विकेट देखील नावावर केले. तर इशांत शर्माने अखेरच्या ओव्हरमध्ये 2 विकेट काढले अन् दिल्लीची लाज राखली. कोलकाताकडून गोलंदाजीत वरूण चक्रवर्ती आणि वैभव अरोरा यांनी चांगली गोलंदाजी केली. वैभवने 4 ओव्हरमध्ये 27 धावा दिल्या अन् 3 विकेट्स नावावर केल्या. तर वरूणने 4 ओव्हरमध्ये 33 धावा देत 3 विकेट्स काढल्या.

कोलकाताचा संघ - पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (w/c), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद.

दिल्लीचा संघ - फिलिप सॉल्ट (W), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (C), रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

Read More