Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Kavya Maran : Live सामन्यात कॅमेरामॅनच्या कृत्यावर संतापली काव्या; Video व्हायरल

पंजाबविरूद्धच्या सामन्यात टीम जिंकल्याचा आनंद काव्याच्या चेहऱ्यावर दिसून आला होता. दरम्यान यंदाच्या सिझनमध्ये पंजाब विरूद्धच्या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे SRH ची मालकीण कॅमेरामॅनवर चांगलीच नाराज झाली. 

Kavya Maran : Live सामन्यात कॅमेरामॅनच्या कृत्यावर संतापली काव्या; Video व्हायरल

Kavya Maran Video: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) टीमची मालकीण काव्या मारन (Kavya Maran) टीमला सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक सामन्याला मैदानात दिसते. नुकतंच पंजाब किंग्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये देखील काव्या मैदानात आली होती. मात्र या सामन्यादरम्यान कॅमेरामनच्या एका कृत्यावर काव्या चांगलीच संतापलेली दिसली. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पंजाबविरूद्धच्या सामन्यात टीम जिंकल्याचा आनंद काव्याच्या चेहऱ्यावर दिसून आला होता. दरम्यान यंदाच्या सिझनमध्ये पंजाब विरूद्धच्या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे SRH ची मालकीण कॅमेरामॅनवर चांगलीच नाराज झाली. 

सोशल मीडियावर व्हायरल झाला काव्याचा व्हिडीओ

सोशल मीडियावर काव्या मारनचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये काव्या कॅमेरामॅनवर संतापलेली दिसतेय. यामध्ये सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनला कॅमेरामॅनने स्क्रिनवर दाखवलं. मात्र यावेळी सतत कॅमेरावर दाखवत असल्याने काव्या चांगलीच संतापली. यावेळी ती चिडून 'हट यार' असं म्हणाली. यावेळी सतत कॅमेरावर दाखवणं तिला आवडलं नसल्याचं समजतंय. 

कोण आहे काव्या?

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काव्याने तिचे वडील कलानिती मारन यांच्यासोबत बिझनेसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.  काव्या मारन ही सध्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) टीमच्या सीईओ आहे. काव्या सध्या सन टीव्ही नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्ट सन एनएक्सटीची प्रमुख आहे. 

यंदाच्या सिझनमध्ये हैदराबादची खराब सुरुवात

काव्या मारनची टीम सनरायझर्स हैदराबादने पहिल्या दोन सामन्यांमध्ये खराब कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीमुळे चाहते चांगलेच निराश झाले होते. मात्र पंजाबविरूद्धच्या सामन्यात हैदराबादने चांगलंच कमबॅक केलं. तिसऱ्या सामन्यामध्ये हैदराबादने पंजाब किंग्जचा 8 विकेट्सने सहज पराभव केला. या विजयानंतर मालकीण काव्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं दिसलं.

हैदराबादचा पहिला विजय

पंजाबविरूद्ध हैदराबादच्या सामन्यात 144 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादच्या टीमची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. हैदराबादचा कर्णधार एडम मारक्रम आणि राहुल त्रिपाठी यांच्या पार्टनरशिपच्या जोरावर हैदराबादच्या टीमने पहिला विजयाचा पाया रचला. या सामन्यात राहुल त्रिपाठीने राहुल त्रिपाठी 74 रन्सची खेळी केली. यावेळी त्याने त्याचं अर्धशतक अवघ्या 35 बॉल्समध्ये पूर्ण केलं. हैदराबादचा हा पहिला विजय होता. 

Read More