Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Kagiso Rabada नं सासू-सासऱ्यांची केली हिंदीत मनधरणी, Video पाहून तुम्हीही हसाल

टी 20 वर्ल्डकप स्पर्धा रंगतदार वळणावर आली. ग्रुप स्टेज सामन्यात दोन मोठे उलटफेर पाहायला मिळाले. नामिबियाने श्रीलंकेचा, तर स्कॉटलँडने वेस्ट इंडिजचा पराभव केला. असं असताना दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. मैदानात फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा कगिसो रबाडाची हिंदी बोलताना त त फ फ झाल्याची दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही तसंच म्हणाल. 

Kagiso Rabada नं सासू-सासऱ्यांची केली हिंदीत मनधरणी, Video पाहून तुम्हीही हसाल

Kagiso Rabada Hindi Video: टी 20 वर्ल्डकप स्पर्धा रंगतदार वळणावर आली. ग्रुप स्टेज सामन्यात दोन मोठे उलटफेर पाहायला मिळाले. नामिबियाने श्रीलंकेचा, तर स्कॉटलँडने वेस्ट इंडिजचा पराभव केला. असं असताना दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. मैदानात फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा कगिसो रबाडाची हिंदी बोलताना त त फ फ झाल्याची दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही तसंच म्हणाल. रबाडा आपल्या प्रेयसीच्या आई-वडिलांना इम्प्रेस करण्यासाठी आरजे करिष्माकडून टिप्स घेताना दिसत आहे. पण यावेळी रबाडाने खूप चुका केल्या असून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. हा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

रबाडासोबत या व्हिडीओमध्ये आरजे करिष्मा दिसत आहे. एकमेकांचा हात हातात घेत त्यांनी हा व्हिडीओ बनवला आहे. "नमस्ते मम्मी जी, ईस्ट या वेस्ट, मेरी मम्मी सबसे बेस्ट. मैं आपके परिवार को पाके धनिया हो गया हूं.' यावर करिश्माने त्याला रोखलं आणि सांगितलं की,'धन्य हो गया हूं, धनिया नहीं." त्यानंतर सासऱ्याचं मन वळवण्यासाठी रबाडा म्हणाला, "नमस्ते सुअर जी", तेव्हा करिश्मा पुन्हा एकदा त्याला अडवते सांगते, 'ससूर जी'. त्यानंतर रबाडा माफी मागतो आणि सांगतो, "सॉरी में तुमे चाहता हूं". पुन्हा चूक झाल्याचं सांगून करिश्मा म्हणते, "क्षमा चाहता हूं, तुमे नहीं." एवढं सांगून दोघं निघून जातात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज टी 20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत एकाच गटात आहेत. 

Read More