Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धक्कादायक! आंतरराष्ट्रीय कबड्डी सामन्यात खेळाडूवर गोळीबार, मैदानात एकच खळबळ

सुप्रसिद्ध कब्बड्डी प्लेअर संदीपवर भर मैदानात गोळीबार, 20 राउंड फायरमुळे खेळाडूचा जागीच मृत्यू

धक्कादायक! आंतरराष्ट्रीय कबड्डी सामन्यात खेळाडूवर गोळीबार, मैदानात एकच खळबळ

जालंधर : आंतराराष्ट्रीय कबड्डी सामना सुरू असताना काही अज्ञात मैदानात घुसले आणि त्यांनी खेळाडूच्या अंगावर एक दोन नाही तर तब्बल 20 राऊंड फायरिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी संध्याकाळी कबड्डीपटूची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

ही धक्कादायक घटना पंजाबच्या जालंधर जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या कबड्डीपटूचं नाव संदीप नंगल अंबिया आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार स्टेडियममध्ये कबड्डीची स्पर्धा सुरू होती. अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. यामध्ये संदीप नंगर अंबियाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मैदानात मोठं गोंधळाचं वातावरण होतं. फायरिंगनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. 

fallbacks

मैदानात उपस्थितांनी खेळाडूला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र जास्त रक्तस्त्राव झाल्यानं कबड्डीपटूचा मृत्यू झाला. पोलिसांकडून या प्रकरणी सध्या तपास सुरू आहे. कबड्डीपटूवर का हल्ला झाला? या हल्ल्यामागे नेमकं काय कारण होतं याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. 

Read More