Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

बॉलिवूडच्या या हॉट अभिनेत्रीला डेट करतोय क्रिकेटर के एल राहुल

निधी आणि राहुलचे फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत. 

बॉलिवूडच्या या हॉट अभिनेत्रीला डेट करतोय क्रिकेटर के एल राहुल

मुंबई : आयपीएल सीझन ११ मध्ये पंजाबकडून खेळणारा क्रिकेटर के एल राहुल सध्या प्रेमात पडलाय... या नव्या कोऱ्या प्रेमकहाणीच्या निमित्तानं पुन्हा एकदा क्रिकेट आणि बॉलिवूड जगत जवळ-जवळ आलंय. होय, राहुलची गर्लंफ्रेंड हीदेखील बॉलिवूडमधली एक हॉट अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री म्हणजे निधी अग्रवाल.... निधी आणि राहुलचे फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत. नुकतंच के एल राहुल आणि निधी अग्रवाल यांना मुंबईत एकत्र पाहिलं गेलं.... त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चांणा उधाण आलंय. 

fallbacks
निधी आणि राहुल

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गेल्या काही दिवसांपासून निधीला डेट करतोय. आयपीएलच्या व्यस्त शेड्युलमुळे राहुल खूपच व्यस्त होता. परंतु, टूर्नामेंट संपल्यानंतर मात्र निधीला भेटण्यासाठी त्यानं अजिबात विलंब लावला नाही. बुधवारी दोघांना एकत्र डिनर घेताना पाहिलं गेलं. एका फाईव्ह स्टार रेस्टोरंटबाहेर दोघांना एकत्र पाहिलं गेलं. 

राहुल आणि निधी मुंबईच्या वांद्रे भागातील एका रेस्टोरंटमध्ये डिनर करून बाहेर पडले... आणि एका गाडीतूनच निघून गेले.

निधी एक अभिनेत्री आणि मॉडल आहे. तीनं टायगर श्रॉफसोबत 'मुन्ना मायकल' या सिनेमातून बॉलिवूड डेब्यु केला होता.

Read More