Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

लग्नानंतर जसप्रीत बुमराहनं संजनासोबतचा शेअर केला क्युट फोटो

बुमराह आणि संजनानं यापूर्वी मेहंदी, संगीत आणि हळदीच्या सेरेमनीचे फोटो शेअर केले होते.

लग्नानंतर जसप्रीत बुमराहनं संजनासोबतचा शेअर केला क्युट फोटो

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंडच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतल्यानंतर जसप्रीत बुमराहने लग्न केलं आहे. त्याला टी 20 आणि वन डे सीरिजमधून आराम देण्यात आला आहे. बुमराह आणि संजनाचे लग्नसमारंभातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता लग्नानंतरचा एक क्युट फोटो समोर आला आहे. या फोटोनं चाहते पुरते घायाळ झाले आहेत.

संजनानं लग्नाआधीचे आणि लग्नातील विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अगदी संगीत सेरेमनीत बुमराह आणि संजनानं केलेल्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता हा क्युट फोटोनं चाहत्यांच्या मनाला भुरळ घातली आहे. या फोटोमध्ये संजना खूपच सुंदर दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

बुमराहने ब्लेझर घातलं आहे तर संजनानं जांभळ्या रंगाचा खूप सुंदर ड्रेस घातला आहे. संजना गणेशननं आपल्या इन्स्टाग्रावर हा फोटो शेअर केला आहे. लग्नाबद्दल दिलेल्या शुभेच्छांसाठी तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत. इतकच नाही तर प्रेमातून प्रेरित होऊन आम्ही दोघांनी एक नवीन सुरुवात केली आहे. आज आमच्या जीवनातला सर्वात आनंदाचा दिवस आहे असं म्हणत तिने शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे खूप आभार मानले आहेत.

Read More