Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Jasprit Bumrah : ओली पोपला धक्का देणं बुमराहला पडलं महागात, आयसीसीने केली मोठी कारवाई!

ICC Code of Conduct : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICC ने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोठी कारवाई केली आहे.

Jasprit Bumrah : ओली पोपला धक्का देणं बुमराहला पडलं महागात, आयसीसीने केली मोठी कारवाई!

ICC Code of Conduct : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने (ICC) भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला फटकारलं आहे. इंग्लंडच्या फलंदाज ओली पोप रन पळत असताना बुमराहने जाणीवपूर्वक पोपला रोखण्याचा प्रयत्न केला, असा आरोप बुमराहवर करण्यात आला आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहला आयसीसी आचारसंहितेच्या लेवल 1 चं उल्लंघन केल्याबद्दल अधिकृतपणे फटकारण्यात आलं आहे.

पहिल्या सामन्यादरम्यान मैदानावर असलेले अंपायर पॉल रायफल आणि ख्रिस गॅफनी, थर्ड अंपायर मारेस इरास्मस आणि फोर्थ अंपायर रोहन पंडित यांनी बुमराहवर हे आरोप केले होते. त्यानंतर बुमराहवर कारवाई करण्यात आली आहे. आयसीसी आचारसंहितेच्या लेवल 1 चं उल्लंघन झालं तर मॅच फीमधील 50 टक्के फी आणि दोन डिमेरिट्स पॉईंट्स देण्यात येतात. मात्र, बुमराहचा 1 डिमेरिट्स पॉईंट्स कापण्यात आला असून त्याला केवळ आयसीसीने (Jasprit Bumrah reprimanded) फटकारलं आहे. त्याची मॅच फी कापण्यात आली नसल्याचं देखील समजतंय.

सामन्यात नेमकं काय झालं होतं?

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाच्या 81 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली होती. ओली पोप (Ollie Pope) मैदानात पाय रोवून उभा होता. भारताच्या त्याच्या विकेटची गरज होती. त्याचवेळी रोहित शर्माने बुमराहला गोलंदाजीसाठी आणलं. ओलीने बुमराहचा बॉल खेळला पण बॉल त्याच्या पॅडला लागला. त्यामुळे अंपायरने लेग बाय दिला. त्यावेळी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओलीच्या मार्गात बुमराहने अडथळा निर्माण केला. त्यावेळी पोप आणि बुमराहचे खांदे आदळले. त्यावेळी दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची देखील झाली.

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर बुमराहने ओली पोपची माफी देखील मागितली होती. बुमराहने आपली चूक मान्य केली असून आयसीसीच्या एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरी रिची रिचर्डसनने त्याला ठोठावलेली शिक्षाही मान्य केल्याची माहिती समोर आली आहे.

Read More