Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आयपीएल ११ : इशान किशनने सांगितलं विस्फोटक खेळीमागच रहस्य

 मी बॉलवर नजर ठेवून माझा नैसर्गिक खेळ केल्याचे त्याने सांगितले. 

आयपीएल ११ : इशान किशनने सांगितलं विस्फोटक खेळीमागच रहस्य

मुंबई : इशान किशनच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर मुंबईची टीम आयपीएल सीझन ११ च्या टॉप ४ मध्ये पोहोचली आहे. काल कोलकाताच्या टीमसोबत झालेल्या सामन्यात मुंबईने २० ओव्हरमध्ये २१० रन्स बनविले. इशान किशन या मॅचचा हिरो ठरला. त्याने २१ बॉलमध्ये ६२ रन्सची तूफानी खेळी करत आपल्या टीमच जिंकण सुनिश्चित केलं.  २१० रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला कोलकात्याचा संघ १८ व्या ओव्हरमध्येच गारद झाला. कोलकात्याचा संघ १८.१ ओव्हरमध्ये १०८ रन्सच बनवू शकला. इशानने आपल्या विस्फोटक खेळीबद्दल सांगितले आहे.

नैसर्गिक खेळ केला 

कॅप्टन रोहित शर्मासोबत माझ बोलण झाल. त्याने मला माझा स्वाभाविक खेळ करायला सांगितला.त्यानंतर मी बॉलवर नजर ठेवून माझा नैसर्गिक खेळ केल्याचे त्याने सांगितले. आपल्याला स्वत:वर विश्वास ठेवायला लागतो. मी कोणत्याही नंबरवर खेळ करण्यास तयार असल्याचेही तो म्हणाला. ईशान काल जेव्हा बॅटींग करायला मैदानात आला तेव्हा मुंबईचा संघ ८.६ ओव्हरमध्ये २ विकेट आणि ६२ रन्स असा होता. त्यानंतर इशानने २१ बॉलमध्ये ६ सिक्स आणि ५ फोरच्या मदतीने विस्फोटक खेळी केली. त्यानंतर कोलकात्याच्या संघाकडे जिंकण्यासारख काही राहिलच नव्हत.  

Read More