Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Team India : इशान किशनच्या द्विशतकाने 'या' स्टार खेळाडूची कारकीर्द संपवली!

Ishan Kishan ODI double century : एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणारा इशान किशन जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

Team India : इशान किशनच्या द्विशतकाने 'या' स्टार खेळाडूची कारकीर्द संपवली!

Team India: टीम इंडियाचा यष्टीरक्षक यष्टीरक्षक फलंदाज 24 वर्षीय इशान किशनने (Ishan Kishan ODI double century) बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावून इतिहास रचला. इशान किशनने शनिवारी (11 डिसेंबर) बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये 131 चेंडूत 210 धावा करून खळबळ उडवून दिली. इशान किशनच्या किलर इनिंगमध्ये 24 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणारा इशान किशन जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

दिग्गज क्रिकेटपटूचे खळबळजनक विधान

भारताचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने (dinesh karthik ) इशान किशनबाबत खळबळजनक विधान केले आहे. दिनेश कार्तिक म्हणतो की, ईशान किशनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये हे द्विशतक झळकावून टीम इंडियाच्या एका मोठ्या स्टार क्रिकेटरची कारकीर्द संपवली आहे. वास्तविक, दिनेश कार्तिकच्या म्हणण्यानुसार, ईशान किशनने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावून अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या वनडे करिअरचा शेवट केला आहे.

इशान किशनने 'या' स्टार खेळाडूची कारकीर्द संपवली

ईशान किशनच्या द्विशतकानंतर शिखर धवनची कारकीर्द धोक्यात असल्याचे सांगत दिनेश कार्तिकने मोठे वक्तव्य केले आहे. दिनेश कार्तिकने एक मोठं विधान केलं आणि म्हणाला, 'या द्विशतकानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून इशान किशनला तुम्ही कसे बाहेर ठेवू शकता हे पाहणे आता रंजक ठरेल. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शिखर धवनचे स्थान कुठे आहे, हा मोठा प्रश्न आहे.

टीम इंडियात पुन्हा स्थान मिळणे कठीण

दिनेश कार्तिक म्हणाला, 'जर रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळला तर शिखर धवनला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागेल आणि यामुळे त्याच्या करिअरचा दुःखद अंत होऊ शकतो.' शिखर धवनने बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 7, 8 आणि 3 धावा केल्या आहेत. या फ्लॉप कामगिरीनंतर शिखर धवनला पुन्हा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण होणार आहे.

Read More