Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IRE vs IND, 2nd T20I : दीपक हुड्डाचा धमाका, आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात वादळी शतक

टीम इंडियाचा युवा बॅट्समन दीपक हुड्डाने (Deepak Hudda) आपल्या टी 20 कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात वादळी शतक झळकावलं आहे.

IRE vs IND, 2nd T20I : दीपक हुड्डाचा धमाका, आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात वादळी शतक

डबलिन : टीम इंडियाचा युवा बॅट्समन दीपक हुड्डाने (Deepak Hudda) आपल्या टी 20 कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात वादळी शतक झळकावलं आहे. हुड्डाने आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात अवघ्या 54 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. या शतकासह हुड्डाने मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलंय. (ire vs ind 2nd t20i team india deepak hooda maiden century against ireland at the village dublin)

दीपक हुड्डाने नाबाद 57 बॉलमध्ये 104 धावांची खणखणीत खेळी केली. यामध्ये त्याने 9 खणखणीत फोर आणि 6 गगनचुंबी सिक्स खेचले.  हुड्डाच्या टी 20 कारकिर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. तसेच दीपक टी 20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा चौथा भारतीय ठरला. याआधी टीम इंडियाकडून रोहित शर्मा, केएल राहुल आणि सुरेश रैना या तिघांनीच टी 20 मध्ये शतक ठोकलंय.

आयर्लंडला विजयासाठी 226 धावांचे आव्हान 

दरम्यान हुड्डाने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियालने आयर्लंडला विजयासाठी 226 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हमध्ये 7 विकेट्स गमावून 225 धावा केल्या. 

हुड्डा व्यतिरिक्त टीम इंडियाकडून संजू सॅमसनने 77 रन्सची खेळी केली. मात्र या दोघांव्यतिरिक्त इतरांना विशेष काही करता आलं नाही. 

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : 

संजू सॅमसन, ईशान किशन (विकेटकीपर), दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवि बिश्नोई आणि उमरान मलिक.

Read More