Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अल्ट्रामॅन स्पर्धेत कृष्ण प्रकाश यांनी मोडला मिलिंद सोमणचा रेकॉर्ड

अल्ट्रामॅन स्पर्धेत कृष्ण प्रकाश यांनी मोडला मिलिंद सोमणचा रेकॉर्ड

मुंबई : विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅण्ड इथे खडतर समजली जाणारी 'अल्ट्रामॅन स्पर्धा' यशस्वीपणे पूर्ण केलीये. जगभरातील 54 स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला होता. भारतातर्फे ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणारे कृष्ण प्रकाश हे एकमेव पोलीस अधिकारी ठरलेत. 10 किलोमीटर पोहण्याचा टप्पा, तसंच तब्बल 421 किलोमीटरचा सायकलिंगचा पल्ला आणि 84 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करण्याचा विक्रम कृष्ण प्रकाश यांनी केला आहे.

याआधी फ्लोरिडामध्ये झालेल्या स्पर्धेत अभिनेता मॉडेल मिलिंद सोमण याने 34 तास 49 मिनिटांची वेळ नोंदवत अल्ट्रामॅन स्पर्धेचा किताब मिळवला होता. कृष्ण प्रकाश यांनी हा विक्रम मोडीत काढत 34 तास 21 मिनिटांत हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करत अल्ट्रामॅनचा किताब मिळवला आहे. ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणं एक आव्हान असल्याचं ऑस्ट्रेलियात राहणारे ब्रिस्बेन मराठी मंडळाचे सदस्य डॉक्टर अमोल देशमुख यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन मराठी मंडळातर्फे कृष्ण प्रकाश यांचा या कामगिरीबद्दल खास गौरवही करण्यात आला.  

Read More