Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'केरळमधील एका तरुणाला तुम्ही...,' भारतीय संघात स्थान मिळण्याबद्दल संजू सॅमसन स्पष्टच बोलला

IPL 2024: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने भारतीय संघात स्थान मिळवणं किती कठीण आहे यावर भाष्य केलं आहे. तसंच आगामी आयपीएल स्पर्धेवरही भावना व्यक्त केल्या.   

'केरळमधील एका तरुणाला तुम्ही...,' भारतीय संघात स्थान मिळण्याबद्दल संजू सॅमसन स्पष्टच बोलला

भारतीय क्रिकेटर संजू समॅसनचा प्रवास हा अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधील एक यशस्वी खेळाडू असला तरी संजू सॅमसन भारतीय संघात आपलं स्थान निश्चित करु शकलेला नाही. तीनपैकी एकाही फॉरमॅटमध्ये त्याला भारतीय संघात जागा मिळालेली नाही. दरम्यान आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये संघातील निवडीबद्दल त्याला विचारण्यात आलं. यावर त्याने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खडतर स्पर्धा सुरु आहे सांगत नेमकी काय स्थिती आहे याची माहिती दिली. 

स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत संजू सॅमसनने मान्य केलं की, त्याच्यासारख्या केरळमधील तरुणाला संघात स्थान मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे."जेव्हा तुम्ही जगातील सर्वोत्तम देशात क्रिकेट खेळत असता तेव्हा मोठं आव्हान असतं. भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. खेळाडूंची संख्या, कौशल्य आणि स्पर्धा प्रचंड आहे. माझ्यासारख्या केरळमधील एका तरुणाला जर येथे येऊन भारतीय संघात स्थान निश्चित करायचं असेल तर त्याला काहीतरी विशेष कामगिरी करावी लागेल," असं संजू सॅमसनने म्हटलं आहे.

दरम्यान एक फलंदाज म्हणून त्याच्या दृष्टिकोनाबद्दल विचारलं असताना, सॅमसन म्हणाला की "आपण नेहमीच इतरांच्या तुलनेत वेगळी कामगिरी करण्यावर लक्ष देतो. पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्यासही माझी हरकत नाही".

"ज्याप्रकारे मी फलंदाजी करतो त्यातून इतरांपेक्षा वेगळेपण दिसावं अशी इच्छा होती. मला माझी स्वत:ची वेगळी स्टाईल तयार करायची होती. सामन्याचा पहिला चेंडू असला तरी मला फरक पडत नाही. मी पुढे जाऊन षटकार ठोकणार. माझी विचारसरणीच तशी झाली आहे. मला काहीतरी वेगळं करायचं आहे. षटकार लगावण्यासाठी 10 चेंडूंची वाट पाहण्याची काय गरज? मी मोठे फटके लगावण्यामागे हेच कारण आहे," असं संजू समॅसमनने सांगितलं आहे.

"करोना काळात मी फार मेहनत घेतली. अनेक लोकांनी मला मदत केली. मी फार आनंदी आहे. गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत आहेत. मी कधीच समाधानी होत नाही. मला मैदानात जाऊन ज्या संघाचं प्रतिनिधित्व करत आहे त्यांच्यासाठी चांगलं खेळायचं आहे," असं संजू सॅमसन म्हणाला आहे.

Read More