Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2024 RR vs MI: मुंबई की राजस्थान कोण जिंकणार आजचा सामना? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

RR vs MI head to head record: आयपीएलच्या 38 वा सामना आज (22 एप्रिल 2024) मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असणार आहे. अग्रस्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सचे आज जिंकण्याचे आव्हान असेल तर  मुंबईच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. 

IPL 2024 RR vs MI: मुंबई की राजस्थान कोण जिंकणार आजचा सामना? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

IPL 2024 RR vs MI head to head record News in Marathi: आयपीएल 2024 मध्ये आज (22 एप्रिल) हंगामातील 38 वा सामना हा मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) असणार आहे. पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर असलेले राजस्थान रॉयल्स आणि सातव्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सचे संघ आमनेसामने येतील. आजचा सामना राजस्थानची राजधानी जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसनकडे असेल तर मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे असेल. आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आतापर्यंत राजस्थान रॉयल्स चांगल्या लयीत असून 12 गुणांसह ते शीर्षस्थानी आहेत. तर दुसरीकडे गेल्या चार सामन्यांत मुंबईच्या संघाने तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. हंगामाच्या खराब सुरुवातीनंतर गुणतालिकेत ते सहाव्या स्थानी पोहोचले आहेत. राजस्थानविरुद्ध विजय मिळवायचा झाल्यास मुंबईला सर्वच विभागांत कामगिरी उंचवावी लागेल.  या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

हेड टू हेड आकडेवारी

मुंबई आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत 29 सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये मुंबईने 15 विजयांसह आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, राजस्थानने 13 विजय मिळवले आहेत. दोघांमधील एक सामना अनिर्णित राहिला. परिणामी आजचा सामना कोण जिंकणार हे पाहवं लागेल.

अशी असेल खेळपट्टी 

अशा परिस्थितीत आज जयपूरच्या खेळपट्टीची आणि हवामानाची स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरून जयपूरमध्ये आज धावांचा पाऊस पडेल की गोलंदाजांचे चेंडू पेटतील की नाही याचा अंदाज लावता येईल. या हंगामाता जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर 4 सामने खेळले गेले आहेत. या मैदानावरील प्रत्येक सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 180 हून अधिक धावा केल्या आहेत. या 4 पैकी, नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनदा विजय मिळवला, तर दोन संघ 170+ धावा करू शकले पण तरीही ते लक्ष्यापासून कमी पडले. अशापरिस्थितीत या मैदानावर धावांच संख्या अधिक होईल कि विकेटची हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

हवामानाचा अंदाज 

जयपूरमध्ये आज कडक उष्मा असणार आहे. येथील कमाल दिवसाचे तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत असेल. पण संध्याकाळच्या वेळेत तापमानात काहीशी घसरण होईल आणि सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल तेव्हा ते 28 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचेल. या कालावधीत हवेतील आर्द्रता पातळी 26% असेल. जयपूरमध्ये पावसाची शक्यता नाही. 

अशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग 11 

मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेईंग 11: रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेविड, रोमारियो शेफर्ड, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्जी, श्रेयस गोपाल, जसप्रित बुमराह. 

राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेईंग 11 : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सैमसन (विकेटकीपर, कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिम्रोग हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल. 

Read More