Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

त्याला 9 कोटींचा फायदा पण RCB ला मोठा आर्थिक फटका; महिला ऑक्शनरची चूक पडली महागात

IPL 2024 Auction Auctioneer Mallika Sagar Mistake: इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ऑक्शनर म्हणून एका महिलेने काम पाहिलं. मात्र त्यांच्या एका चुकीचा फटका आरसीबीला बसला.

त्याला 9 कोटींचा फायदा पण RCB ला मोठा आर्थिक फटका; महिला ऑक्शनरची चूक पडली महागात

IPL 2024 Auction Auctioneer Mallika Sagar Mistake: इंडियन प्रीमिअर लीगच्या म्हणजेच आयपीएलच्या 2024 च्या पर्वासाठीचा लिलाव मंगळवारी, 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये पार पडला. या लिलावामध्ये अनेक विक्रम रचले गेले. आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच लिलावामध्ये 20 कोटींहून अधिक रक्कमेची बोली लावण्यात आली. मिचेल मार्श आणि पॅट कमिन्सला अनुक्रमे 24 कोटी 75 लाख आणि 20 कोटी 50 लाखांची बोली लावण्यात आली. मिचेल मार्शला केकेआरने तर पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतलं. या लिलावामध्ये अगदी नवख्या खेळाडूंसाठीही संघांमध्ये चढाओढ दिसून आली. याचा सर्वाधिक फायदा खेळाडूंनाच झाला.

पहिल्यांदाच महिला ऑक्शनर

यंदाच्या वेळेस पहिल्यांदाच आयपीएलच्या लिलावामध्ये ऑक्शनर म्हणून महिला दिसून आली. मल्लिका सागर यांनी दुबईमधील आयपीएलच्या लिलावामध्ये ऑक्शनर म्हणून कार्यरत होत्या. मात्र पहिल्यांदाच आयपीएलसाठी काम करताना मल्लिका सागर यांच्याकडून एख मोठी चूक झाली. याचा मोठा फटका रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला बसला. आरसीबीचा मल्लिका सागर यांच्यामुळे मोठा तोटा झाला. 3 संघ कॅरेबियन खेळाडू अल्जारी जोसेफसाठी बोली लावत असताना मल्लिका सागर यांनी ही चूक केली. तिन्ही संघांमध्ये जोरदार चुरस असतानाच हा प्रकार घडला.

नेमकं घडलं काय?

वेस्ट इंडीजचा स्टार क्रिकेटपटू अल्जारी जोसेफ हा त्याच्या भेदक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएल 2024 मध्ये या भन्नाट गोलंजाला आपल्या संघात घेण्यासाठी 3 टीममध्ये चुरस लागली. 1 कोटींच्या बेस प्राइजपासून अल्जारी जोसेफवर बोली लागण्यास सुरुवात झाली. सुरुवातीलाच 10 पैकी 4 संघांनी अल्जारी जोसेफला संघात घेण्यासाठी रस दाखवला. यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा समावेश होता. सर्वात आधी चेन्नईच्या संघाने जोसेफसाठी बोली लावली. दिल्लीने चेन्नईला या बोलीमध्ये आव्हान दिलं. मात्र 3 कोटींपर्यंत पोहोचल्यानंतर धोनीच्या संघाने माघार घेतली. पण त्यानंतरही 3 संघांमध्ये जोसेफसाठी बोली सुरुच होती. शेवटी आरसीबीने 11.50 कोटींना जोसेफला आपल्या संघात घेतलं. मात्र ऑक्शनर मल्लिका सागर यांनी बोली 6.40 कोटींवर होती तेव्हा एक मोठा गोंधळ घातला.

आरसीबीला बसला आर्थिक फटका

बोली 6.40 कोटींवर पोहोचल्यानंतर सर्वजण शांत झाले. मात्र तितक्यात आरसीबीने यामध्ये एन्ट्री मारली. आरसीबीने 6.60 कोटींची बोली जोसेफसाठी लावली. मात्र ऑक्शनर मल्लिका यांनी 6.60 कोटी बोलवण्याऐवजी 6.80 कोटींची घोषणा केली. शेवटी जोसेफला 11.50 कोटी रुपयांना आरसीबीने विकत घेतलं. म्हणजेच या साऱ्या डीलमध्ये आरसीबीचं 20 लाखांचं नुकसान झालं.

9 कोटींहून अधिकचा फायदा

अल्जारी जोसेफला 2022 च्या लिलावामध्ये गुजरात टाटन्सच्या संघाने 2.40 कोटींना विकत घेतलं. त्यानंतरच्या पर्वातही अल्जारी जोसेफ गुजरातमधूनच खेळला. मात्र 17 व्या पर्वाआधी गुजरातने त्याला करारमुक्त केलं. मात्र या करारमुक्तीचा फायदा अल्जारी जोसेफला झाला आणि त्याला 2.40 कोटींऐवजी 11.50 कोटी रुपये मिळाले. 

Read More