Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2023: 'जूनं ते सोनं..' आयपीएलमध्ये क्रिकेटमधून बाद झालेल्या खेळाडूंचा धमाका

Veteran Cricketers in IPL: टी-20 क्रिकेट हा सुरुवातीला तरुण खेळाडूंचा फॉर्मेट मानला जात होता. पण हळूहळू यात अनुभव किती महत्त्वाचा असतो हे सिद्ध व्हायरला लागलं. 

IPL 2023: 'जूनं ते सोनं..' आयपीएलमध्ये क्रिकेटमधून बाद झालेल्या खेळाडूंचा धमाका

Veteran Cricketers in IPL: 2008 ला आयपीएलच्या पहिल्या हंगामाला सुरुवात झाली आणि आता आयपीएलचा सोळावा हंगाम खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्नने (Shane Warne) राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) पहिलं जेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), जॅक कॅलिस (Jacques Kallis) आणि शोएब अख्तर (Shoaib Akhtar) सारख्या खेळाडूंनी लौकीकाला साजेशी कामगिरी केली. त्यामुळे क्रिकेटच्या कोणत्याही फॉर्मेटमध्ये वय महत्वाचं नाही हे स्पष्ट होतं. 

आयपीएलला सीनिअर खेळाडूंच्या दमदार कामगिरीची परंपरा लाभली आहे. यात मॅथ्यू हेडन, ख्रिस गेल, अॅडम गिलख्रिस्ट, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉट्सन, रॉबिन उत्थप्पा, प्रविण तांबे असे अनेक ज्येष्ठ खेळाडूंचा समावेश आहे. आता 2023 च्या आयपीएलमध्येही असेच काही ज्येष्ठ खेळाडू धमाका करतायत. यात पहिलं नाव आहे ते एमएस धोणीचं. याशिवाय दिनेश कार्तिक, फाप डु प्लेसिस, अंबाती रायडू असे सीनिअर खेळाडूही आहेत.

पण यंदाच्या आयपीएलचं वैशिष्ट्य म्हणजे क्रिकेटमधून जवळपास बाद झालेले खेळाडू पुन्हा एकदा मैदान गाजवतायत. गेल्या काही सामन्यात या खेळाडूंनी तरुणांनाही लाजवेल अशी कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. हे खेळाडू आहेत अमित मिश्रा (Amit Mishra), पियूष चावला (Piyush Chawla) आणि ईशांत शर्मा (Ishant Sharma).

अमित मिश्रा, पियूष चावला आणि ईशांत शर्मा हे तीनही खेळाडू मोठ्या काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. गेल्या आयपीएलमध्ये तर या तिघांवर एकाही फ्रँचाईजीने बोलीही लावली नव्हती. पण या हंगामात या खेळाडूंवर फ्रँचाईजीने बोलीही लावली आणि त्यांना खेळायला मैदानातही उतरवलं. 

717 दिवसांनी ईशांत आयपीएलमध्ये
सलग पाच पराभव स्विकारणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला पहिला विजय मिळवून दिला तो वेगवाग गोलंदाज ईशांत शर्माने. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ईशांतचा दिल्लीने प्लेईंग XI मध्ये समावेश केला. मिळालेल्या संधीचं ईशांतनेही सोनं केलं. चार षटकात ईशांतने केवळ 19 धावा देत दोन विकेट घेतल्या. इतकंच नाही तर प्लेअर ऑफ दे मॅचचा खिताबही त्याने पटकावला.

मुंबईचा संकटमोचक पीयूष चावला
मुंबई इंडियन्ससाठी या हंगामात सर्वाधिक विकेट आणि सर्वोत्तम इकोनॉमी रेट असलेला गोलंदाज म्हणजे पीयूष चावला. पीयूष चावलाचा इकोनॉमी रेट आहे 7.15 आणि त्याने गेल्या पाच सामन्यात सात विकेट मिळवल्यात. 

लखनऊचा आधारस्तंभ
लेग स्पीनर अमित मिश्रा आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळतोय. त्याला तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्याचा इकोनॉमी रेट 7 इतका आहे. 

Read More