Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2023 Eliminator : लेका आणखी किती पंगे घेणार? नवीनचे 'जुने' कारनामे पाहून, सुनील गावस्कर संपातले आणि...

IPL 2023 Eliminator MI Vs LSG : नवीन-उल-हक याला कोणत्या शब्दांत गावस्करांनी फटकारलं? एकदा पाहाच. क्रिकेटप्रेमी हा व्हिडीओ थांबवून थांबवून पाहतायत. 

IPL 2023 Eliminator : लेका आणखी किती पंगे घेणार? नवीनचे 'जुने' कारनामे पाहून, सुनील गावस्कर संपातले आणि...

IPL 2023 Eliminator MI Vs LSG : नाही म्हणता म्हणता अखेर मुंबईच्या संघानं आयपीएलमध्ये मजल दरमजल करत क्रिकेटप्रेमींचा विश्वास सार्थ ठरवला. बुधवारी खेळवल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघानं Lucknow Super Giants ला 81 धावांनी नमवलं. पाच वेळा आयपीएलचं जेतेपद नावावर करणाऱ्या मुंबईच्या संघाचा आत्मविश्वास यावेळी वाखाणण्याजोगा होता. 

चेन्नईमध्ये (Chennai) खेळवल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईनं दिलेल्या 183 धावांचा पाठलाग करत असताना लखनऊचा संघ थोडक्यातच गडबडला. संघातील कोणत्याही खेळाडूला फलंदाजीत छाप उमटवता आली नाही. गोलंदाजांनी मात्र लखनऊच्या संघाला चांगली साथ दिली. मुंबईच्या फलंदाजांना घाम फोडण्यामध्ये लखनऊच्या Naveen-ul-Haq या खेळाडूनं महत्त्वाची भूमिका बजावली. पण, चार गडी बाद करत आणि आक्रमक पवित्रा ठेवून खेळतही या साऱ्याचा संघाला मात्र फायदा झाला नाही. थोडक्यात यंदाच्या वर्षातील लखनऊचं आयपीएलमधील आव्हान आता संपुष्टात आलेलं आहे. 

सामना गाजला, पण कोणामुळं? 

मुंबई आणि लखनऊ या दोन्ही संघांमधील सामना गाजण्याची अनेक कारणं ठरली. पण, त्यातही नवीन उल हक याच्या प्रच्येत कृतीनं क्रीडाप्रेमींच्या नजरा वळवल्या. आयपीएलमध्येच विराटशी झालेली बाचाबाची, त्यानंतरच्या सोशल मीडिया पोस्ट आणि त्यात आता मुंबईविरोधातील सामन्यातही त्याचं हेच रुप पुन्हा पाहायला मिळालं. 

रोहित शर्मा आणि कॅमरून ग्रीन यांना बाद केल्यानंतर नवीननं काहीशा विचित्र अंदाजात हा आनंद साजरा केला. shut-out-the-noise अशा प्रकारची प्रतिक्रिया देत त्यानं कान बंद केले आणि तसाच चेहऱ्यावर काहीसे रागीट भाग आणत तो काही क्षण मैदानात उभा राहिला. त्याचं हे वागणं कॉमेंट्री करणाऱ्या सुनील गावस्कर यांनाही खटकलं. 

हेसुद्धा वाचा : Ravichandran Ashwin : 'तो' गेल्यानंतर भारताने चांगली कामगिरी केली; धोनीबाबत अश्विनच्या वक्तव्याने एकच खळबळ

 

Brilliant, terrific delivery... असं म्हणत त्यांनी नवीनच्या गोलंदाजीची प्रशंसा केली. पण, पुढच्याच क्षणाला त्यांनी त्यानं साजरा केलेला आनंद आपल्याला काही कळला नाही, असंही सांगितलं. ग्रीनला बाद केल्यानंतर नवीननं जे काही केलं ते पाहिल्यानंतर विकेट मिळाल्याचा आनंद नेमका कसा साजरा करावा याबाबत मग गावस्करांनी गोड शब्दांत त्याचे कान टोचले. 

शतकी खेळी असो किंवा मग गडी बाद करणं असो, अशा वेळी कान बंद करण्याऐवजी कानामागे हात धरत तिथं असणाऱ्या क्रिकेटप्रेमींचा कल्ला ऐकणं अपेक्षित असतं, असं म्हणत गावस्करांनी आनंद साजरा करण्याची व्याख्या मांडली. नवीनचा अंदाज मात्र त्यांच्या या व्याख्येपेक्षा इतका वेगळा होता की, त्यांच्या बोलण्यातूनही संताप स्पष्ट जाणवत होता. 

मुळात जे गावस्करांनी आणि इतर खेळाडूंनी पाहिलं, तेच मैदानाबाहेर असणाऱ्या क्रिकेटप्रेमींनीही पाहिलं. ज्यानंतर हा नवीन जुन्याच कुरापती करत पंगे घेतोय... अशा प्रतिक्रिया अनेकांनीच दिल्या. एक खेळाडू म्हणून तुम्हाला त्याचं हे वागणं पटलं का? 

Read More