Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरची प्रतीक्षा वाढली; MI च्या 'या' 25 वर्षीय ऑलराऊंडरचीच चर्चा

IPL 2023 : मुंबईच्या संघाची यंदाचीही सुरुवात पराभवानंच झाली. संघ मैदानात आला विजयाच्या अपेक्षा घेऊन पण, परतला हाती पराभव घेऊन. असं असलं तरीही मुंबईच्या संघातील एका खेळाडूची बरीच चर्चा झाली.   

IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरची प्रतीक्षा वाढली; MI च्या 'या' 25 वर्षीय ऑलराऊंडरचीच चर्चा

IPL 2023 : आयपीएलच्या नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात झालेली असतानाच मुंबईच्या संघाला मात्र अपेक्षित सुरुवात झालेली नाही. नुकत्याच झालेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू या दोन्ही संघांमधील सामन्यामध्ये बंगळुरूच्या संघानं बाजी बारली आणि मुंबईच्या क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. मुंबईचा संघ मैदानात आला तेव्हा जसप्रीत बुमराहची जागा कोण भरून काढणार? हाच प्रश्न अनेकांना पडला होता. पण, एक नाव समोर आलं आणि याचंही उत्तर मिळालं. असं असलं तरीही हे उत्तर काहीसं अनपेक्षित होतं. 

हे नाव होतं संघातील 25 वर्षी अर्शद खान या खेळाडूचं. बुमराहची जागा भरण्यासाठी मुंबईकडून मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील गोपाळगंज येथील अर्शद खान या खेळाडूची निवड करण्यात आली. तिथे अर्शद खान (Arshad Khan) संघात आला आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा, अर्जुन तेंडुलकर (Arjun tendulkar) याची संघात येण्याची प्रतीक्षा आणखी लांबली. त्यामुळं अर्जुनच्या खेळीची वाट पाहणाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे हेच आता स्पष्ट झालं आहे. 

खेळाप्रती एकनिष्ठ... 

मागील वर्षीसुद्धा अर्शदची मुंबईसाठी निवड करण्यात आली होती. पण, कोणताही सामना न खेळता दुखापतग्रस्त असल्यामुळं तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. पण, इथंही त्यानं माघार घेतली नाही. अर्शद सिवनी ते जबलपूर असा 300 किमीचा प्रवास फक्त या खेळाच्या सरावासाठी करत होता. इथं वेळेवर पोहोचण्यासाठी साधारण पहाटेचे 3 वाजता तो घर सोडत होता. 2019-20 मध्ये सीके नायडू टुर्नामेंटमध्ये त्यानं 36 गडी बाद केले होते. त्यानं 400 धावा केल्या. आसामविरुद्धच्या सामन्यात त्यानं 134 धावांची अप्रतिम खेळी दाखवली होती. 

अवघ्या 11 व्या वर्षी अर्शदनं मध्य प्रदेशच्या संघात स्थान मिळवलं होतं. आयपीएलमध्ये येण्याआधी तो डीवाय पाटील चषकामध्ये रिलायन्स 1 च्या वतीनं खेळला होता.

हेसुद्धा वाचा : Rohit Sharma On Jasprit Bumrah: पराभवानंतर रोहितला आली जस्सीची आठवण, म्हणाला "बुमराहशिवाय आमचं..."

माहितीसाठी... 

2022 मध्ये आयपीएलच्या लिलिवात अर्शदला मुंबईच्या संघानं 20 लाखांची बोली लावत निवडलं होतं. तेव्हापर्यंत त्यानं लिस्ट ए मधील अवघे तीन सामनेच खेळले होते. पण, तरीही संघात निवड होणं ही त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीनं महत्त्वाची बाब होती. 

Read More