Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2023 संदर्भात मोठी बातमी; दोन दिग्गज खेळाडू स्पर्धेला मुकणार? समोर आली महत्त्वाची माहिती

Indian Premier League 2023: IPL 2023 मध्ये दोन दिग्गज खेळाडूने पुढील हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2023 संदर्भात मोठी बातमी; दोन दिग्गज खेळाडू स्पर्धेला मुकणार? समोर आली महत्त्वाची माहिती

Indian Premier League:  इंग्लंडने यंदाच्या वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकत दुसऱ्यांदा ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर आता इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) स्पर्धेकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आयपीएलचा छोटा लिलाव (मिनी ऑक्शन) 23 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी,  आयपीएल 2023 साठी कायम राखलेल्या खेळाडूंच्या नावांची अंतिम यादी देण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे.

तसेच आत्तापर्यंत पहिल्या ट्रेडिंग विंडोमध्ये 4 ट्रेड झाले आहेत. या संपूर्ण घडामोडींदरम्यानच आयपीएलच्या आगामी हंगामातून ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार व कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळणारा ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि मिचेल स्टार्क (Mitchell Starc)  माघार घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. हे दोन्ही दिग्गज वेगवान गोलंदाज यावर्षी होणाऱ्या ऍशेस मालिकेच्या तयारीसाठी वेळ देतील.  

दरम्यान कमिन्स हा मागील तीन वर्षांपासून केकेआर (KKR) संघाचा भाग आहे. तर, स्टार्क 2018 च्या आयपीएल (IPL 2023) लिलावानंतर आयपीएलमध्ये दिसला नाही. त्याने अखेरच्या वेळी आयपीएलमध्ये 2015 साली आपले कौशल्य दाखवलेले. तसेच कमिन्स पुढील आयपीएल हंगामात खेळणार नसल्याने केकेआरला जबर धक्का बसला आहे.

वाचा : कंबोडियाचे पंतप्रधान Corona Positive; नरेंद्र मोदींसह जो बायडन यांची घेतली भेट 

त्याच्या आधी इंग्लंडच्या सॅम बिलिंग्सनेही (Sam Billings) कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला होता. केकेआरने या आयपीएल हंगामासाठी आपली तयारी सुरू केली असून, तीन खेळाडूंना ट्रेडिंग विंडोमध्ये आपल्या ताफ्यात सामील करून घेतलेय. 

तसेच आयपीएल 2023 साठी आता काही महिने शिल्लक असून या हंगामासाठी 23 डिसेंबर रोजी कोचीमध्ये मिनी लिलाव होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) सर्व आयपीएल संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या कायम ( Retained Players ) ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितलं आहे. यंदा हा हंगाम पहिल्याप्रमाणे होम आणि अवे फॉरमॅटमध्ये होणार आहे. ज्यामुळे सर्व दहा संघ त्यांचे 7 सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत 7 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहेत.

Read More