Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

KKR vs GT : दोन दिवसांपूर्वी ज्याने कौतुक केले त्यालाच शेवटच्या ओव्हरमध्ये चोपलं... रिंकू सिंगचे चॅट व्हायरल

 KKR vs GT  :  रविवारी नरेंद्र मोदी स्टेडिमवर झालेल्या रोमांचक सामन्यात  केकेआरने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे.  या रोमांचक सामन्यात शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी 29 धावांची गरज होती. रिंकू सिंगने (Rinku Singh) शेवटच्या षटकात पाच षटकार मारत कोलकाताला विजय मिळवून दिला.

KKR vs GT : दोन दिवसांपूर्वी ज्याने कौतुक केले त्यालाच शेवटच्या ओव्हरमध्ये चोपलं... रिंकू सिंगचे चॅट व्हायरल

KKR vs GT  : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या (IPL 2023) रविवारच्या सामन्यानंतर रिंकू सिंग (Rinku Singh) हेच नाव प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या ओठांवर आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात खेळल्या गेलेल्या  सामन्यात रिंकू सिंगची मुख्य भूमिका निभावली आहे. रिंकूची खेळी पाहून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. डावखुरा फलंदाज रिंकू सिंगने सामन्याच्या शेवटच्या षटकात असा काही अप्रतिम खेळ दाखवला त्याचे कौतुक करायला शब्द कमी पडले आहेत.

गुजरात टायटन्स तिसऱ्या विजयाच्या उंबरठ्यावर असताना रिंकू सिंगने विजय हिसकावून घेतला. शेवटच्या षटकाच्या आधी रिंकूने एक षटकार आणि एक चौकार लगावला होता. त्यानंतर शेवटच्या षटकात कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 29 धावा हव्या होत्या. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमेश यादवने एकच धाव घेतली आणि स्ट्राईक रिंकू सिंहकडे दिली. आता कोलकाताला पाच चेंडूत 28 धावा करायच्या होत्या. गुजरात टायटन्सच्या यश दयालच्या हातात चेंडू होता आणि समोर रिंकू सिंग फलंदाजी करत होता.

ओव्हरच्या दुसरा चेंडूवर रिंकूने लाँग ऑफला षटकार मारला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूला रिंकूने स्क्वेअर लेग बाऊंड्रीबाहेर दुसरा षटकार ठोकला. यश दयालच्या चौथ्या चेंडूवर पुन्हा रिंकूने षटकार ठोकला. पाचव्या चेंडूवर रिंकू सिंगने लाँग ऑनवर चौथा षटकार मारला. आता सामना जिंकण्यासाठी केकेआरला 4 धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर काय होणार याकडे सगळ्याचं लक्ष्य लागले होते. शेवटच्या स्लोवर शॉर्ट बॉलवर पुन्हा रिंकूने लाँग ऑनच्या बाहेर आणखी एक तुफानी षटकार खेचला आणि केकेआरला सामना जिंकवून दिला.

या सगळ्यामध्ये गुजरातच्या यश दयालने महत्त्वाच्या शेवटच्या षटकात 31 धावा दिल्या. त्यामुळे आता टीकेचा धनी ठरला आहे. मात्र आता रिंकू सिंह आणि यश दयाल यांचे जुने चॅट व्हायरल होत आहे. यशने रिंकूच्या दमदार कामगिरीबाबत यामध्ये भाष्य केले होते.  मोठा खेळाडू भाऊ (Big Player Bhai) असे यशने म्हटले होते. त्यावर रिंकूने भाई अशी प्रतिक्रिया दिली होती. दोनच दिवसांनी रिंकूने यशच्या षटकात पाच षटकार मारून केकेआरला सामना जिंकवून दिला आहे. 

fallbacks

रिंकू आणि यशमधील व्हायरल होत असलेल्या चॅट हे 6 एप्रिलच्या मॅचनंतरचे आहे. त्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात सामना झाला होता. त्या दिवशीही रिंकू सिंगने 33 चेंडूत 46 धावा करत शानदार खेळी केली होती. विजयानंतर रिंकूने एका पोस्टमध्ये, न विसरण्यासारखा विजय. मोठ्या संख्येने  येण्यासाठी आणि आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार, असे म्हटले होते. त्यावर यशने मोठा खेळाडू भाऊ असे म्हटले होते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku (@rinkukumar12)

दरम्यान, रविवारी खेळल्या गेलेल्या IPL 2023 च्या सामन्यात रिंकू सिंहने कोलकाता नाईट रायडर्सच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा पराभव केला. एकापाठोपाठ एक असे पाच षटकार मारून रिंकूने संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे त्याचे जोरदार कौतुक केले जात आहे. या सामन्यात रिंकूने 21 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. आयपीएलमध्ये एका षटकात पाच षटकार मारण्याच्या विक्रमासह रिंकू सिंहने 20 व्या षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला आहे. 

Read More