Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL ट्रॉफी जिंकल्यानंतरही 'या' खेळाडूचं करिअर धोक्यात

आयपीएल 2022 च्या ट्रॉफीवर गुजरात टायटन्सने नाव कोरत इतिहास रचला. 

IPL ट्रॉफी जिंकल्यानंतरही 'या' खेळाडूचं करिअर धोक्यात

मुंबई : आयपीएल 2022 च्या ट्रॉफीवर गुजरात टायटन्सने नाव कोरत इतिहास रचला. 15 व्या हंगामात पदार्पण करत ट्रॉफीवर नाव कोरणारा गुजरात हा एकमेव संघ ठरलाय. या विजेतेपदानंतर गुजरातच्या खेळाडूच्या कामगिरीचे कौतूक होतेय. तर काही खेळाडूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या खेळाडूंना पुढच्या हंगामात संघातून डावलण्याचीही चर्चा सुरु आहे.  

गुजरात टायटन्सच्या सर्वच खेळाडूंनी उत्क़ृष्ट  खेळ करत संघाला ट्रॉफी जिंकून दिली. मात्र काही खेळाडू तितकीशी चांगली कामगिरी करू शकले नाही. यामध्ये मॅथ्यू वेडच नाव आघाडीवर येते. या हंगामात गुजरात टायटन्सचा मॅथ्यू वेड अजिबात लयीत दिसला नाही. वेडला त्याच्या बॅटीतून साजेशा धावाचं काढता आल्या नाहीत.तो गुजरात टायटन्सच्या फलंदाजीची सर्वात मोठी कमजोरी म्हणून उदयास आला. 

दरम्यान आयपीएलच्या मध्यावर कर्णधार हार्दिक पांड्यानेही त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र नंतर त्याचा पुन्हा संघात संधी दिली होती. मात्र या संधीच तो सोने करू शकला नाही. संपुर्ण हंगाम त्याचा खराब फॉर्म कायम राहीला.आयपीएल 2022 च्या 10 सामन्यांमध्ये त्याने केवळ 157 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियन संघाला 2021 चा टी-20 विश्वचषक मिळवून देण्यात वेडची महत्त्वाची भूमिका होती, परंतु आयपीएल 2022 मध्ये वेडची बॅट शांत राहिली.पुढच्या हंगामात त्याला गुजरात संघ आपल्या ताफ्यात घेईल की नाही याची शक्यता कमी आहे. त्यामुळे वेडची आयपीएल कारकीर्दही धोक्यात आली आहे. 

Read More