Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

गायकवाडची फटकेबाजी, चौधरीचा 'चौकार', चेन्नईचा हैदराबादवर 13 धावांनी विजय

महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) कॅप्टन होताच चेन्नई सुपर किंग्स विजयी मार्गावर आली आहे. चेन्नईने (Csk) हैदराबादवर (SRH) 13 धावांनी विजय मिळवला आहे.

गायकवाडची फटकेबाजी, चौधरीचा 'चौकार', चेन्नईचा हैदराबादवर 13 धावांनी विजय

पुणे :  चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादवर (SRH) 13 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईने हैदराबादला विजयासाठी  203 धावांचे कडकडीत आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 189 धावाच करता आल्या.  (ipl 2022 srh vs csk chennai super kings win by 13 runs against sunrisers hyderabad) 

हैदराबादकडून निकोलस पूरनने सर्वाधिक नाबाद 64 धावांची खेळी केली. मात्र त्याला टीमला विजय मिळवून देता आला नाही. पूरन व्यतिरिक्त कॅप्टन केन विलियमसनने 47 धावा केल्या. सलामीवीर अभिषेक शर्माने 39 रन्स केल्या. मात्र इतर फलंदाजांना विशेष असं काही करता आलं नाही. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मिचेल सॅंटनर आणि प्रिटोरियस या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.   

चेन्नईची बॅटिंग 

दरम्यान त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉनवे या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांची पिसं काढली. 

ऋतुराज आणि डेवोन या दोघांनी हैदराबादच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. ऋतुराजचं शतक अवघ्या 1 धावेसाठी हुकलं. दुर्देवाने ऋतुराज नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला.  ऋतुराजने 57 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 6 फोरसह 99 धावांची शानदार वादळी खेळी केली. 

तर दुसऱ्या बाजूला डेवोनने 55 बॉलमध्ये 8 फोर आणि 4 सिक्ससह 85 धावांनी नाबाद खेळी केली. कॅप्टन महेंद्रसिंह धोनी 8 धावा करुन माघारी परतला. तर रवींद्र जाडेजा 1 धावेवर नॉट आऊट परतला. हैदराबादकडून टी नटराजनने 2 विकेट्स घेतल्या. 

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन : केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंह, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, मार्को जानसेन आणि उमरान मलिक.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन : एमएस धोनी (कॅप्टन/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेवोन कॉन्वे, अंबाती रायडू, सिमरजीत सिंह, रवींद्र जडेजा,  ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, मुकेश चौधरी आणि महीष तीक्ष्णा.

Read More