Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2022 : हैदराबाद टीमच्या नावावर सर्वात लाजीरवाणा रेकॉर्ड

केन विल्यमसनला मोठा धक्का, हैदराबादच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, प्रत्येक टीमला वाटेल 'हा' रेकॉर्ड कधीच मोडू नये

IPL 2022 :  हैदराबाद टीमच्या नावावर सर्वात लाजीरवाणा रेकॉर्ड

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 5 वा सामना हैदराबाद विरुद्ध राजस्थान झाला. हैदराबाद टीमसाठी पहिल्या सामन्याची सुरुवात अत्यंत वाईट झाली. आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात राजस्थानकडून पराभव स्वीकारावा लागली. 

केन विल्यमसननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आणि तिथेच सगळा घोळ झाला. आयपीएलची सुरुवात हैदराबाद टीमसाठी फार चांगली झाली नाही. यासोबत हैदराबादला दोन मोठे धक्केही बसले. केनवर मोठी कारवाई करण्यात आली. दुसरं म्हणजे टीमच्या नावावर लाजीरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

हा रेकॉर्ड आपल्या टीमच्या नावे असावा असं कधीच कोणत्याही टीमला वाटणार नाही. हा लाजीरवाणा आणि नकोसा रेकॉर्ड नेमका कोणता आहे जाणून घेऊया. 

राजस्थान टीमने पहिली फलंदाजी करून 210 धावांचं लक्ष्य हैदराबाद संघासमोर ठेवलं. हैदराबाद संघ पावर प्लेमध्ये दबावात खेळताना दिसला. 3 गडी गमवल्यानंतर पुन्हा टीम रुळावर आलीच नाही. तिथेच मनोबल खचल्यासारखं खेळत होते. 

पावरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा लाजीरवाणा विक्रम हैदराबाद संघाच्या नावावर आहे. या यादीमध्ये हैदराबाद पहिल्या क्रमांकावर आहे. सुरुवातीच्या 6 ओव्हरमध्ये 14 धावा केल्या आणि 3 विकेट्स गमवले. 

पावर प्लेमध्ये सर्वात कमी स्कोअर करणाऱ्या टीम
14-3 सनरायझर्स हैदराबाद
14-2 राजस्थान रॉयल्स
15-2 चेन्नई सुपर किंग्स
16-1 चेन्नई सुपर किंग्स

हैदराबादमधून केन आणि अभिषेकने सुरुवात केली. विल्यमसननं 2 धावा केल्या तर राहुल त्रिपाठी शून्यवर आऊट झाला आहे. निकोलस पूरनही खातं उघडण्यात अपयशी झाला. 

राजस्थान टीमने पहिल्याच सामन्यात आपली ताकद दाखवली. गेल्यावर्षी राजस्थानची बाकी टीम्सने मिळून धुलाई केली होती. यावेळी मात्र राजस्थान टीम खूप उत्तम खेळत असल्याचं दिसत आहे.

संजू सॅमसनने 27 बॉलमध्ये 55 धावा केल्या. जोश बटलरने 28 बॉलमध्ये 35 धावा केल्या. तर यशस्वी जयस्वालने 20 धावांचं टीममध्ये योगदान दिलं.  देवदत्त पड्डीकलने 29 बॉलमध्ये 41 धावा केल्या. 

Read More