Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2022, RCB vs KKR | रंगतदार सामन्यात बंगळुरुचा कोलकातावर 3 विकेट्सने विजय

 शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या लो स्कोअरिंग मॅचचा क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज थरार आजच्या सामन्यात पाहायला मिळाला. आरसीबीने (RCB) केकेआरवर (KKR) 3 विकेट्सने विजय मिळवला आहे.

IPL 2022, RCB vs KKR | रंगतदार सामन्यात बंगळुरुचा कोलकातावर 3 विकेट्सने विजय

मुंबई : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या लो स्कोअरिंग मॅचचा क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज थरार आजच्या सामन्यात पाहायला मिळाला. आरसीबीने (RCB) केकेआरवर (KKR) 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरने बंगळुरुला विजयासाठी 129 धावांचं आव्हान दिलं होतं. हे विजयी आव्हान बंगळुरुने अखेरच्या ओव्हरमधील 4 चेंडू राखून आणि 7 विकेट्स गमावून पूर्ण केलं. (ipl 2022 match 6 rcb vs kkr banglore win the match by 3 wickets against kolkata at d y patil stadium)

बंगळुरुकडून शेरफन रुदरफोर्डने सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. शहबाज अहमदने 27 धावांचं योगदान दिलं. अखेरीस दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल या जोडीने बंगळुरुला विजयापर्यंत पोहचवलं. 

तर कोलकाताकडून  टीम साऊथीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर उमेश यादवने 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. तसेच सुनील नरीन आणि वरुण चक्रवर्थी या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला. 

कोलकाताच्या गोलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण इतक्या लो स्कोअरिंग सामन्यातही या गोलंदाजांनी आपल्या धावसंख्येचा फार शानदारपणे बचाव करत बंगळुरुला विजयासाठी अखेरच्या ओव्हरपर्यंत वाट पाहावी लागली. 

कोलकाताच्या गोलंदाजांच्या या कामगिरीचं सोशल मीडियावर तोंडभरुन कौतुक केलं जात आहे.

कोलकाता प्लेइंग इलेव्हन

श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर,  नितीश राणा, आंद्रे रसेल, सॅम बिलिंग्स,  सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन, टीम साउथी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती. 

आरसीबी प्लेइंग इलेव्हन

फॅफ डुप्लेसीस (कॅप्टन), अनुज रावत,  दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शेरफाने रुदरफोर्ड, विराट कोहली, डेव्हिड विली, वानेंदु हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि ए दीप

Read More