Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2022 : 'हा' खेळाडू होणार RCB चा नवा कर्णधार? घेणार विराट कोहलीची जागा

मेगा ऑक्शनपूर्वी RCB ने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या तिन खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे.

IPL 2022 :  'हा' खेळाडू होणार RCB चा नवा कर्णधार? घेणार विराट कोहलीची जागा

मुंबई : IPL 2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी RCB ने विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) या तिन खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे. याशिवाय मेगा ऑक्शनमध्ये आता RCB ची नजर काही मोठ्या खेळाडूंवर असेल. पण त्याआधी प्रश्न असा आहे की येत्या हंगामात RCB संघाचा कर्णधआर कोण असणार?

माजी क्रिकेटपटू डॅनिअल व्हिटोरीने (Daniel Vettori) यावर उत्तर दिलं आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हा आरसीबीचा नवा कर्णधार असू शकतो, हे पद त्याच्याकडे एका हंगामापुरतंही असू शकतं असं व्हिटोरीने म्हटलं आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात मॅक्सवेलने दमदार कामगिरी केली होती. मेलबर्न स्टार्सच्या कर्णधारपदाचाही त्याच्याकडे अनुभव असल्याचं व्हिटोरी यांनी म्हटलं आहे. 

fallbacks

ग्लेन मॅक्सवेल उत्तम फलंदाजाबरोबरच एक चांगला कर्णधारही आहे. आयपीएलमध्ये मॅक्सवेलने किंग्ज इलेव्हन पंजाबचं (Punjab Kings XI) नेतृत्वही केलं होतं. त्याशिवाय बिग बॅशमध्ये त्याच्या नेतृत्वात मेलबर्न स्टार्सने 62 पैकी 34 सामने जिंकले आहेत. 

विराट कोहली नंतर आरसीबी ग्लेन मॅक्सवेलला कर्णधार बनवू शकतो, असा विश्वास आरसीबीचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांनी व्यक्त केला आहे, आरसीबीने मॅक्सवेलला 11 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. गेल्या मोसमात ग्लेन मॅक्सवेलने आरसीबीसाठी अप्रतिम कामगिरी केली होती, त्या जोरावर आरसीबीने प्ले ऑफमध्ये धडक मारली होती. 

कर्णधार बदलल्याने आरसीबी संघाचं नशीब बदलेल आणि ते पहिल्यांदाच आयपीएलही जिंकतील, अशी संघाच्या चाहत्यांची नक्कीच अपेक्षा असेल.

Read More