Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भल्याभल्या ग्लॅमरस अभिनेत्रींना टक्कर देणारी SRH चा बॉलर संदीप शर्माची पत्नी आहे तरी कोण?

SRH चा बॉलर संदीप शर्माची पत्नी देतेय ग्लॅमरस अभिनेत्रींना टक्कर, कोण आहे Natasha Sathwick?

भल्याभल्या ग्लॅमरस अभिनेत्रींना टक्कर देणारी SRH चा बॉलर संदीप शर्माची पत्नी आहे तरी कोण?

नवी दिल्ली: आयएपीएलमधील (IPL) सनरायझर्स हैदराबाद  (Sunrisers Hyderabad)  संघातील वेगवान गोलंदाज संदीप शर्माने (Sandeep Sharma) आपल्या गर्लफ्रेंडसोबत नुकताच विवाह केला. त्याच्या पत्नी विषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. संदीप शर्माची गर्लफ्रेंड दिसायला ग्लॅमरस आणि तितकीच बुद्धीमान आहे. नताशा सात्विक (Natasha Sathwick) नेमकी कोण आहे? ती सध्या काय करते याची उत्सुकता अनेक चाहत्यांना आहे. आज तिच्याबद्दल आपण जाणून घेऊया. 

नताशा सात्विक पेशाने ज्वेलरी डिझायनर आहे. याशिवाय ती ब्लॉगर आणि डिजिटल मार्केटिंग स्पेशिलिस्ट आणि Entrepreneur आहे. बिशप कॉटन्स स्कूलमधून तिचं शिक्षण झालं आहे. 2014 मध्ये 'नेशनल स्कूल ऑफ फॅशन टेक्नोलॉजीमधून तिने ज्वेलरी डिझायनिंगचा कोर्स केला. तिने त्यामध्ये पदवी घेतली. 

नताशा सात्विकने 2013मध्ये दावणम ज्वेलर्स इथे तिने इंटर्नशिपमधून स्वत:च्या करियरची सुरुवात केली. 2014 मध्ये तनिष्क ज्वेलर्ससोबत 6 महिने इंटर्नशिप केली. नताशाने सध्या स्किल 9 यूनिव्हर्सल अॅकेडमीमध्ये मॅनेजिंग डिरेक्टर आणि क्रिएटीव्ह हेड म्हणून काम करते.  

सनरायझर्स हैदराबाद संघातील संदीप शर्मा आणि नताशा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. 2021मध्ये त्यांनी लग्न करून सर्वांना ही गोड बातमी दिली. नताशा बंगळुरूची आहे. तर संदीप शर्मा पंजाबच्या पटियाला इथला आहे. आयपीएल सीझन 2 मध्ये संदीप शर्माचं लक चमकणार का? नताशा त्याच्यासाठी लेड लक ठरणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

Read More