Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2021 SRH vs DC: पंतच्या चुकीमुळे रनआऊट झाला पृथ्वी; रागानं आपटलं हेल्मेट, व्हिडीओ

एक चूक आणि घोळ झाला, चांगल्या फॉर्ममध्ये खेळणारा पृथ्वी शॉ पंतमुळे आऊट झाला, क्रिझवर नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

IPL 2021 SRH vs DC: पंतच्या चुकीमुळे रनआऊट झाला पृथ्वी; रागानं आपटलं हेल्मेट, व्हिडीओ

मुंबई: विराट कोहलीचा संताप IPLसामन्या दरम्यान पाहिला आहे. त्याने आऊट झाल्यानंतर रागाने खुर्ची ढकलून दिली. असाच आणखी एक दिल्ली कॅपिटल्स संघातील फलंदाजाचा व्हिडीओ समोर आला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतची एक चूक पृथ्वी शॉला महागात पडली आणि तो रनआऊट झाला. 

सनरायझर्स हैदराबादचा बॉलर जगदीश सुचिथ याने 12 व्या ओव्हरमध्ये तिसरा बॉल टाकला. तो बॉल जॉनी बेअरस्टोच्या हातून फील्डर खलील अहमदकडे गेला. त्यावेळी पंत सिंगल रन घेण्यासाठी क्रिझवरून निघाला पण आऊट होण्याच्या भीतीनं तो पुन्हा मागे आला. त्यावेळी झालेल्या गोंधळामुळे पृथ्वी शॉ रनआऊट झाला. 

हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात पृथ्वी शॉ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. 39 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 53 धावा केल्या.ऋषभ पंतची एक चूक खूप महागात पडली आणि झालेल्या गोंधळामुळे पृथ्वी निराश झाला. पृथ्वी रनआऊट झाल्यानंतर त्याचा राग त्याने पॅव्हेलियनमध्ये येऊन हेल्मेट खाली आपटून काढला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

याआधी कोलकाता विरुद्ध राजस्थान झालेल्या सामन्यात देखील इयोन मॉर्गनचा धावा काढताना गोंधळ झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर दिल्ली विरुद्ध हैदराबाद झालेल्या सामन्यात पुन्हा तोच प्रकार झाल्यामुळे पृथ्वी शॉ रनआऊट झाला आहे. 

Read More