Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2021 : टॅाम कुरेनच्या जागी आज दिल्ली कॅपिटल्सचा हा स्टार खेळाडू मैदानात उतरणार

इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जसारख्या टीम विरुद्ध मॅच जिंकूण आपल्या आयपीएलचा श्री गणेशा केलेली टीम दिल्ली कॅपिटल्स, आज राजस्थान रॉयल्ससोबत संध्याकाळी आपली दुसरी मॅच खेळणार आहे

IPL 2021 : टॅाम कुरेनच्या जागी आज दिल्ली कॅपिटल्सचा हा स्टार खेळाडू मैदानात उतरणार

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जसारख्या टीम विरुद्ध मॅच जिंकूण आपल्या आयपीएलचा श्री गणेशा केलेली टीम दिल्ली कॅपिटल्स, आज राजस्थान रॉयल्ससोबत संध्याकाळी आपली दुसरी मॅच खेळणार आहे. या सीझनच्या सुरवातीला टीमचा खेळाडू एनरिच नॉर्खिया (Anrich Nortje) कोविड टेस्टमध्ये पॉजिटिव्ह असल्याची बातमी समोर आली.

दिल्ली कॅपिटल्सने आपली पहिली मॅच स्टार बॉलर कगीसो रबादा (Kagiso Rabada) आणि नॉर्खिया शिवाय जिंकली. त्यामुळे दुसऱ्या मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. परंतु जर रबादा फिट असेल तर त्याला टॉम कुर्रनच्या जागी घेतले जाऊ शकते. दिल्ली कॅपिटल्सने ट्वीट करुन राजस्थान रॅायल्सला चॅलेंज केले आहे की, ते आता रबाडाला मॅचमध्ये उतरवण्यास तयार आहेत. त्यामुळे रबादा आज दिल्ली खेळताना दिसू शकतो.

धवन आणि पृथ्वीची ओपनिंग जोडी

पहिल्याच मॅचमधून आयपीएलची धमाकेदार सुरवात केलेले शिखर धवन आणि पृथ्वी शॉची जोडी या मॅचमध्ये ही उतरेल. दोघांनीही चेन्नई विरुद्ध आपले अर्ध शतक बनवले आहे.

रहाणे, पंत आणि हेटमायर

मिडिल आर्डर मध्ये कॅप्टन रिषभ पंतसह अनुभवी अजिंक्य रहाणे आणि शिमरोन हेटमायर खेळणार आहेत. चेन्नई विरुद्धच्या धमाकदार ओपनिंगमुळे मीडिल आर्डर खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळाली नाही.

वोक्स आणि स्टोइनिस ऑलराउंडर

टीममध्ये क्रिस वॉक्स आणि मार्कस स्टोइनिस ऑलराउंडरची भूमिका बजावणार आहेत. हे दोघेही खूप मोठे शॉट्स खेळण्या बरोबरच वेगवान बॅालर्स देखील आहेत, ज्याचा टीमला खूप मोठा फायदा होऊ शकतो.

आर अश्विन आणि अमित मिश्रा हे दोघेही मुख्य स्पिनर प्लेइंग इल्वान मध्ये असू शकतात. परंतु फास्ट बॅालर म्हणून टॉम कुर्रानच्या जागी रबादाला टीम मध्ये घेतले जाऊ शकते.

पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, ऋिषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर, क्रिस वोक्स, आर अश्विन, अमित मिश्रा, कगीसो रबादा आणि आवेश खान. हे आजच्या मॅच मधील संभाव्य प्लेइंग इलेव्हन आहेत.

Read More