Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2021 CSK vs MI: पोलार्डचा झंझावात! सर्वात लांब सिक्स ठोकत केला विक्रम

 चेन्नई विरुद्धच्या झालेल्या सामन्यात पोलार्ड गेम चेंजर ठरला आहे. पोलार्डने केलेल्या झंझावाती खेळीमुळे मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळाला आहे.

IPL 2021 CSK vs MI: पोलार्डचा झंझावात! सर्वात लांब सिक्स ठोकत केला विक्रम

मुंबई: चेन्नई विरुद्धच्या झालेल्या सामन्यात पोलार्ड गेम चेंजर ठरला आहे. पोलार्डने केलेल्या झंझावाती खेळीमुळे मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळाला आहे. पोलार्डने 6 चौकार आणि 8 षटकार ठोकत 34 चेंडूमध्ये 87 धावांची खेळी केली. विजयासाठी मुंबईला केवळ 2 धावांची गरज असताना पोलार्डने 2 धावा धावून काढल्या. आपल्या तुफानी खेळीसोबतच पोलार्डनं आणखी एक विक्रम केला आहे.

चेन्नई विरुद्ध झालेल्या सामन्यात किरोन पोलार्डनं 103 मीटर लांब सिक्स ठोकला आहे. याआधी हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात 105 मीटर लांब सिक्स मारण्याचा विक्रम देखील पोलार्डनं केला आहे. त्यानंतर 100 मीटर लांब सिक्स बंगळुरू

संघातील ग्लॅमुंबई संघातील किरोन पोलार्डनं मारलेल्या 103 मीटर लांब सिक्सचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सामना संपवून ड्रेसिंग रूममध्ये आल्यानंतर नेमकं काय घडलं?

किरोन पोलार्डने 17 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं आहे. तो मुंबईसाठी मोठा गेमचेंजर ठरला. सर्वात कमी चेंडूमध्ये अर्धशतक ठोकण्याचा विक्रम करत त्याने मुंबई संघाला विजय मिळवून दिला आहे.

मुंबई संघाने हा सामना जिंकला असला तरी पाँईंट टेबलमध्ये तितका फरक पडलेला दिसला नाही. याचं कारण म्हणजे चेन्नई संघ 7 सामने खेळून 2 सामने पराभूत झालं आहे. तर 5 सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. तर दुसरीकडे मुंबई संघ 4 सामने जिंकून चौथ्या स्थानावर आहे. 

 

Read More