Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रविंद्र जडेजा आणि सुरेश रैनाचा उडाला गोंधळ, नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

एक चूक पडली महागात, पाहा पिचवर नेमकं काय घडलं, जडेजा गोलंदाजाला धडकला आणि...

रविंद्र जडेजा आणि सुरेश रैनाचा उडाला गोंधळ, नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

मुंबई: चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघाचा नुकताच वानखेडे स्टेडियमवर झाला. या सामन्यात ऋषभ पंतच्या संघाला म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवण्यात यश आलं. युवा जोश जिंकला. दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई सुपरकिंग्स संघ फलंदाजी करत असताना पिच एक गोंधळ झाला. 

सुरेश रैनानं आपल्या तुफान फटके बाजीला सुरुवात केल्यानंतर झालेल्या एका चुकीमुळे रैना आऊट झाला. यात चूक कोणाची हा तर अनुत्तरीत प्रश्न आहे मात्र जो गोंधळ झाला त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IPLमध्ये CSK संघाकडून सुरेश रैना चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याच वेळी धावा काढण्यासाठी रविंद्र जडेजा आणि रैना जात होते. एक रन झाला आणि दुसरा काढत असताना जडेजा गोलंदाजावर जोरात धडकला. त्यामुळे एक क्षण गोंधळ उडाला. 

                       Big Mix-up between #Raina #jadeja

रवींद्र जडेजा गोंधळल्यानं त्याला काहीच सुचलं नाही. त्यावेळी तो क्रिझवर अर्धावर पोहोचला असताना पुन्हा मागे फिरला आणि रैना आणि जडेजा एकाच ठिकाणी आले. याच संधीचा फायदा उचलून ऋषभ पंतनं रैनाला रन आऊट केलं.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रविंद्र जडेजाला ट्रोल केलं आहे. जडेजाच्या एका चुकीचा फटका चांगल्या फॉर्ममध्ये खेळणाऱ्या रैनाला बसला आणि तो आऊट झाला असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 

Read More