Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2019 : ५ वेळा आयपीएल जिंकणारा इतिहासातला एकमेव खेळाडू

आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबई चॅम्पियन ठरली.

IPL 2019 : ५ वेळा आयपीएल जिंकणारा इतिहासातला एकमेव खेळाडू

हैदराबाद : आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबई चॅम्पियन ठरली. अत्यंत रोमांचक अशा फायनलमध्ये मुंबईने शेवटच्या बॉलवर चेन्नईचा १ रनने पराभव केला. आयपीएलच्या फायनलमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून १४९ रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉटसनने ८० रनची खेळी करून चेन्नईला विजयाच्या जवळ नेलं, पण मलिंगाने शेवटच्या बॉलवर शार्दुल ठाकूरची विकेट घेऊन मुंबईला चौथी आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली.

आयपीएल जिंकण्याची मुंबईची ही चौथी वेळ आहे. याआधी २०१३, २०१५ आणि २०१७ साली मुंबईने आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. सर्वाधिक आयपीएल जिंकण्याचा विक्रमही मुंबईने २०१९ सालच्या विजयामुळे केला आहे. याआधी मुंबई आणि चेन्नई यांनी प्रत्येकी तीन-तीनवेळा आयपीएल जिंकली होती. याचबरोबर सर्वाधिक ४ आयपीएल स्पर्धा जिंकणारा रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार बनला आहे.

कर्णधार म्हणून रोहित शर्माने चौथ्यांदा आयपीएल जिंकण्याचा विक्रम केला असला तरी त्याच्या नावावर ५ आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रमही झाला आहे. २००९ सालच्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा हैदराबादच्या टीमकडून खेळला होता. पण या टीममध्ये रोहित कर्णधार नव्हता.

रोहितच्या पाठोपाठ सर्वाधिक आयपीएल जिंकण्याचं रेकॉर्ड अंबाती रायुडू, कायरन पोलार्ड आणि लसीथ मलिंगाच्या नावावर आहे. या तिघांनी चारवेळा आयपीएल जिंकली आहे. पोलार्ड, मलिंगा यांनी मुंबईकडू खेळताना २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ साली विजय मिळवला तर, अंबाती रायु़डूने मुंबईकडून खेळताना २०१३, २०१५, २०१७ साली आणि चेन्नईकडून खेळताना २०१८ साली आयपीएल स्पर्धा जिंकली.

सुरेश रैना, धोनी आणि हार्दिक पांड्या यांनी तीनवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली. रैना आणि धोनीने चेन्नईकडून खेळताना २०१०, २०११ आणि २०१८ साली विजय मिळवला. तर हार्दिक पांड्या टीममध्ये असताना मुंबईला २०१५, २०१७ आणि २०१९ साली विजय मिळाला. 

Read More