Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2019 : हॉस्पिटलमधील वडिलांची काळजी घेत, क्रिकेटर पार पाडतोय मैदानातलीही भूमिका

हा खेळाडूसाठी आयपीएलमध्ये आपल्या टीमचा विजय आणि त्यापेक्षाही जास्त हॉस्पिटलमध्ये आपले वडील जीवन-मरणाशी संघर्ष करीत आहेत, ते त्याच्यासाठी सर्वात जास्त चिंतेची बाब आहे.

IPL 2019 : हॉस्पिटलमधील वडिलांची काळजी घेत, क्रिकेटर पार पाडतोय मैदानातलीही भूमिका

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा विकेटकीपर आणि बॅटसमन पार्थिव पटेल सध्या आपल्या व्यक्तिगत जीवनातील अडचणींचा सामना करत आहेत, तरी देखील पार्थिव पटेल लक्ष देऊन टीमकडून खेळत आहे. हा खेळाडूसाठी आयपीएलमध्ये आपल्या टीमचा विजय आणि त्यापेक्षाही जास्त हॉस्पिटलमध्ये आपले वडील जीवन-मरणाशी संघर्ष करीत आहेत, ते त्याच्यासाठी सर्वात जास्त चिंतेची बाब आहे.

पार्थिवचे वडील गुजरातमधील अहमदाबादमध्ये ब्रेम हॅमरेजशी लढाई लढत आहेत. पार्थिव सामना संपल्यानंतर अहमदाबादला जातो, आपल्या वडीलांच्या तब्यतीची विचारपूस केल्यानंतर पुन्ही पुढील सामन्याला हजर राहतो. यासाठी पार्थिव पटेलला टीमकडून विशेष बाब म्हणून परवानगी मिळाली आहे.

द इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, आयपीएलच्या सुरूवातीला फेब्रुवारीमध्ये पार्थिव पटेलने ट्वीटरवर आपल्या वडीलांच्या तब्येतीविषयी लिहिलं होतं, यात पार्थिवने म्हटलं होतं, कृपया माझ्या वडीलांसाठी प्रार्थना करा, ते ब्रेन हॅम्रेजने पीडित आहेत. आता २ महिन्यांपेक्षा अधिक वेळ झाला आहे. तरी देखील त्यांच्या वडीलांची तब्येत बरी नाही. माझे वडील अजय हे आयसीयूमध्ये दाखल आहेत, ते कोम्यातून कधी-कधी बाहेर येतात.

जेव्हा सामना सुरू असतो, तेव्हा माझ्या डोक्यात कोणतेही विचार नसतात. कारण तेव्हा आमच्याकडे मोबाईल फोन देखील नसतो, पण मैदानाच्या बाहेर आल्यानंतर मी सतत वडीलांच्या तब्येतीची विचारपूस करत असतो. डॉक्टरांच्या संपर्कात असतो. माझी आई आणि पत्नी जरी घरी असले, तरी काही महत्वाचे निर्णय डॉक्टरांशी बोलून मला घ्यावे लागतात.

मी आयपीएल१२ हा सिझन खेळणार नव्हतो, पण माझ्या बाबांची इच्छा होती की, मी खेळावं, आशीष नेहरा मला या बाबतीत भावनिक साथ देत असतो. मुश्ताक अली टुर्नामेंटमध्ये खेळणं मी बाबांची काळजी घेण्यासाठी टाळलं.

Read More