Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2019: ईडन गार्डनच्या खेळपट्टीवर कोलकात्याची टीम नाराज, गांगुलीशी बोलणार

आयपीएलच्या १२व्या मोसमात कोलकात्याची टीम प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळण्यासाठी संघर्ष करत आहे.

IPL 2019: ईडन गार्डनच्या खेळपट्टीवर कोलकात्याची टीम नाराज, गांगुलीशी बोलणार

कोलकाता : आयपीएलच्या १२व्या मोसमात कोलकात्याची टीम प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळण्यासाठी संघर्ष करत आहे. पण आता कोलकात्याच्या टीमने त्यांचं घरचं स्टेडियम असलेल्या ईडन गार्डनच्या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला जशी खेळपट्टी हवी होती, तशी खेळपट्टी मिळाली नाही, असं वक्तव्य कोलकात्याचे टीमचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैंकी मैसूर यांनी केलं आहे. तसंच कोलकाता घरच्या मॅच दुसऱ्या स्टेडियममध्ये खेळणार नसल्याचंही मैसूर यांनी स्पष्ट केलं. 

एका कार्यक्रमात बोलताना मैसूर म्हणाले, 'तुम्ही तुमची टीम घरच्या मैदानातील परिस्थितीनुसार ठरवता, कारण या मैदानात तुम्ही ७ मॅच खेळता. घरच्या मैदानाचा फायदा मिळवणं चांगली गोष्ट आहे. यामुळे प्रतिस्पर्धा वाढते.'

कोलकात्याच्या खेळपट्टीबद्दल आम्ही बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली, टीम, पीच क्युरेटर आणि इतर लोकांशी चर्चा करू आणि घरच्या मैदानाचा टीमला फायदा मिळावा यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया मैसूर यांनी दिली. खराब कामगिरीनंतरही प्रेक्षकांनी मैदानात दिलेल्या पाठिंब्याबद्दल मैसूर यांनी आभार मानले आहेत.

 

Read More