Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL: सलामीच्या सामन्यात मुंबईचं चेन्नईसमोर विजयासाठी १६६ रन्सचं आव्हान

आयपीएलच्या ११व्या मोसमाला मुंबईतील वानखेडे स्टेडिअयमध्ये रंगतदार सुरुवात झाली. बॉलिवूड सेलिब्रेटींनी केलेल्या परफॉर्मन्ससोबत ओपनिंग सेरेमनी पार पडली. पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या टीम्समध्ये सुरु आहे. 

IPL: सलामीच्या सामन्यात मुंबईचं चेन्नईसमोर विजयासाठी १६६ रन्सचं आव्हान

मुंबई : आयपीएलच्या ११व्या मोसमाला मुंबईतील वानखेडे स्टेडिअयमध्ये रंगतदार सुरुवात झाली. बॉलिवूड सेलिब्रेटींनी केलेल्या परफॉर्मन्ससोबत ओपनिंग सेरेमनी पार पडली. पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या टीम्समध्ये सुरु आहे. 

मॅचच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात आलेल्या मुंबई इंडियन्सच्या टीमने २० ओव्हर्समध्ये १६४ रन्सपर्यंत मजल मारली. या दरम्यान मुंबई इंडियन्सने ४ विकेट्स गमावले.

हे पण पाहा: IPL मधील पहिली मॅच कोण जिंकणार हे टॉसपूर्वीच झालं होतं निश्चित?

मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर १६५ रन्सचं आव्हान ठेवलं. आहे. मुंबईच्या टीमकडून सूर्यकुमार यादवने २९ बॉल्समध्ये ४३ रन्सची खेळी खेळली. इशन किशनने २९ बॉल्समध्ये ४० रन्स केले. रोहित शर्माने १८ बॉल्समध्ये १५ रन्स केले तर, लेविस शून्यावर आऊट झाला.

चेन्नई सुपर किंग्जच्या टीमकडून वॉटसनने सर्वाधिक म्हणजेच दोन विकेट्स घेतले. तर, चहर आणि इम्रान ताहीर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला.

मुंबई इंडियन्सची टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, मुस्तफिझूर रहमान, इशन किशन, चहर, लेविस, तिवारी, कटिंग, संगवान, ड्युमिनी, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पंड्या, आदित्य तरे, मार्कंड, धनंजय, अंकुल रॉय, मिचेल मॅक्लनघन, मोहसिन खान.

चेन्नई सुपर किंग्जची टीम : महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, डुप्लेसिस, हरभजनसिंग, ड्वेन ब्राव्हो, वॉटसन, सॅम बिलिंग्ज, मार्क वूड, शर्मा, मोनू कुमार, बिश्नोई, केदार जाधव, रायुडू, दीपक, असिफ, एन्गिडी, ध्रुव, मुरली विजय, इम्रान ताहीर, कर्ण शर्मा, चहर, शार्दूल ठाकूर.

Read More