Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रोहित शर्माच्या नावावर नवा रेकॉर्ड

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आपल्या नावावर आणखीन एक रेकॉर्ड केला आहे.

रोहित शर्माच्या नावावर नवा रेकॉर्ड

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आपल्या नावावर आणखीन एक रेकॉर्ड केला आहे.

श्रीलंकेविरोधात झालेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये रोहित शर्माने अवघ्या ३५ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावत एक नवा रेकॉर्ड केला आहे. 

या क्रिकेटरसोबत केली बरोबरी

रोहित शर्मा ने ३५ बॉल्समध्ये धडाकेबाज इनिंग खेळत सेंच्युरी लगावली. यासोबतच त्याने दक्षिण आफ्रिकेच्या डेविड मिलर याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

बांगलादेश विरोधात सेंच्युरी

डेविड मिलर याने २९ ऑक्टोबर रोजी बांगलादेश विरोधात खेळताना ३५ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावली होती. 

फोर लगावत केली रेकॉर्डची बरोबरी

इंदूरमधील होळकर स्टेडिअममध्ये रोहित शर्माने श्रीलंकेविरोधात खेळताना ११ फोर आणि ८ सिक्सर लगावत सेंच्युरी केली. रोहितने अँजिलो मॅथ्युज याच्या बॉलवर फोर लगावत डेविड मिलरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. 

बनला पहिला भारतीय खेळाडू

अवघ्या ३५ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान सेंच्युरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड के एल राहुल याच्या नावावर होता. त्याने वेस्ट इंडिजविरोधात खेळताना ४६ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावली आहे.

धडाकेबाज इनिंग

दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये रोहित शर्माने ४६ बॉल्समध्ये ११८ रन्स केले आहेत. यावेळी त्याने १२ फोर आणि १० सिक्सर लगावले आहेत.

ख्रिस गेलच्या नावावर रेकॉर्ड

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या टीमकडून खेळताना पुणे वॉरियर्स विरोधात ३० बॉल्समध्ये सेंच्युरी केली आहे. 

Read More