Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

INDvsAUS:...तर घरच्या मैदानात कोहलीचा विक्रम होणार!

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बुधवार १३ मार्चला वनडे सीरिजची पाचवी मॅच खेळवण्यात येणार आहे.

INDvsAUS:...तर घरच्या मैदानात कोहलीचा विक्रम होणार!

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बुधवार १३ मार्चला वनडे सीरिजची पाचवी मॅच खेळवण्यात येणार आहे. पहिल्या दोन मॅचमध्ये विजय मिळवलेल्या भारतीय टीमचा उरलेल्या दोन मॅचमध्ये पराभव झाला. यामुळे आता सीरिज बरोबरीत आहे. सीरिज बरोबरीत असल्यामुळे दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात होणाऱ्या या पाचव्या मॅचला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे. पण या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला आणखी एक विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे.

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर आत्तापर्यंत २५ वनडे मॅच झाल्या आहेत. यातल्या २३ वनडे मॅचचे निकाल आले आहेत, तर दोन मॅच रद्द झाल्या आहेत. या मैदानामध्ये आत्तापर्यंत फक्त दोनवेळा टीमना ३०० रनचा टप्पा ओलांडता आला आहे. या मैदानात वेस्ट इंडिजनं सर्वाधिक ३३०/८ एवढा स्कोअर केला आहे. तर पाकिस्तानने या मैदानात ३०२ रन केले होते. ऑस्ट्रेलियाचा या मैदानातला सर्वाधिक स्कोअर २९४/३ आणि भारताचा सर्वाधिक स्कोअर २८९/६ एवढा आहे.

विराटला विक्रमाची संधी

दिल्लीच्या या मैदानात आत्तापर्यंत सात खेळाडूंना वनडे मॅचमध्ये शतक करता आलं आहे. यामध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, एबी डिव्हिलियर्स, केन विलियमसन, निक नाईट, रॉस डायस या खेळाडूंनी फिरोजशाह कोटला मैदानात शतक केलं आहे. यापैकी पाच खेळाडूंनी क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे, तर विराट आणि केन विलियमसन हे दोन्ही खेळाडू क्रिकेट खेळत आहेत. विराट कोहलीकडे या मैदानावर दुसरं शतक करण्याची संधी आहे. या मैदानात वनडे क्रिकेटमध्ये अजूनही दोन शतकं कोणत्याही खेळाडूला करता आली नाहीत.

केमार रोच सगळ्यात यशस्वी बॉलर

फिरोजशाह कोटला मैदानात वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर केमार रोच, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग आणि अजित आगरकर हे सगळ्यात यशस्वी बॉलर आहेत. या चौघांनी फिरोजशाह कोटला मैदानात प्रत्येकी सात-सात विकेट घेतल्या आहेत. रवींद्र जडेजाला या मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली तर तो या मैदानात सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरू शकतो. याआधी २००९ साली भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये फिरोजशाह कोटला मैदानात वनडे मॅच झाली होती. रवींद्र जडेजा आणि एमएस धोनी हे दोनच खेळाडू तेव्हाच्या आणि आताच्या भारतीय टीममध्ये आहेत. धोनीला मात्र या सीरिजच्या शेवटच्या दोन मॅचसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

धोनीने खेळल्या सर्वाधिक मॅच

धोनीने या मैदानामध्ये सर्वाधिक ९ मॅच खेळल्या आहेत. यामध्ये धोनीनं ६५ च्या सरासरीने २६० रन केले. सचिनच्या नावावर या मैदानात सर्वाधिक रनचे रेकॉर्ड आहे. सचिनने या मैदानात ८ मॅचमध्ये ३७.५० च्या सरासरीने ३०० रन केले आहेत. मोहम्मद अजहरुद्दीन या मैदानातला दुसरा सगळ्यात यशस्वी बॅट्समन आहे. अजहरुद्दीनने ७ मॅचमध्ये ६६.७५ च्या सरासरीने २६७ रन केले आहेत.

Read More