Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs AUS T20I : ऑस्ट्रेलियाच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादव नवा कॅप्टन!

Suryakumar Yadav New India Captain :ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी (India vs Austrelia T20I) सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर युवा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) नवा उपकर्णधार असणार आहे.

IND vs AUS T20I : ऑस्ट्रेलियाच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादव नवा कॅप्टन!

India vs Austrelia T20I : वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) पराभवानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी (IND vs AUS T20I) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या खांद्यावर युवा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) नवा उपकर्णधार असणार आहे. 23 नोव्हेंबर पासून खेळल्या जाणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 

श्रेयस अय्यर रायपूर आणि बेंगळुरू येथे झालेल्या शेवटच्या दोन T20 सामन्यांसाठी उपकर्णधार म्हणून संघात सामील होईल. इशान किशन, प्रसिद्ध कृष्णा या वर्ल्ड कपमधील खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर काहीच्या खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. त्याच बरोबर युवा यशस्वी जयस्वाल आणि टिळक वर्मा यांना संधी देण्यात आली आहे. तर गोलंदाजीची धुरा आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग अशा नव्या छाव्यांकडे असणार आहे.

टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.

कसं असेल टीम इंडियाचं शेड्यूल?

पहिला टी-20 सामना - 23 नोव्हेंबर - विशाखापट्टणम
दुसरा टी-20 सामना - 26 नोव्हेंबर - तिरुवनंतपुरम
तिसरा टी-20 सामना - 28 नोव्हेंबर - गुवाहाटी
चौथा टी-20 सामना - 1  डिसेंबर - रायपूर
पाचवा टी-20 सामना - 3  डिसेंबर - बंगळुरू

Sanju Samson ला डच्चू

आयर्लंड दौरा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत गेलेल्या युवा संघातील बहुतांश खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. तसेच राहुल द्रविडच्या जागी भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षकाची भूमिका निभावणार आहे. मात्र, संजू सॅमसन या संघाचा भाग नसेल, हा धक्कादायक निर्णय मानला जात आहे.

Read More