Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

तिरंदाजीमध्ये भारतीय महिला संघाने जिंकलं रौप्य पदक

भारताला तिरंदाजीत पहिलं रौप्य पदक

तिरंदाजीमध्ये भारतीय महिला संघाने जिंकलं रौप्य पदक

मुंबई : भारतीय महिला तिरंदाजांनी मंगळवारी 18 व्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं आहे. आशियाई खेळामध्ये महिला टीमचं कंपाउंड स्पर्धेत हे पहिलं रौप्य पदक आहे. याआधी 2014 मध्ये महिला टीमने या स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं होतं.

दक्षिण कोरियाच्या टीमने भारतीय महिला टीमला फायनल सामन्यात 231-228 ने मात दिली. भारताला 10 व्या दिवशी हे पहिलं पदक मिळालं. भारतीय टीम या सामन्यात चांगली कामगिरी केली. दक्षिण कोरियाला भारतीय टीमने चांगली टक्कर दिली.

भारतीय टीम शेवटच्या 3 शॉटपर्यंत गोल्डच्या रेसमध्ये होती. सामना खूपच रोमांचक होत होता. पण शेवटच्या 3 शॉटमध्ये भारताला गोल्ड मिळवण्यात अपयश आलं. पण भारतीय टीमने आपल्या कामगिरीने अनेकांची मनं जिंकली.

Read More