Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Team India : सामनाची तोडफोड आणि खेळाडूच्या रूममध्ये महिला...भारतीय खेळाडूंकडून नियमांचं उल्लंघन

Indian Team Broke Hotel Rules : दौऱ्यावर भारताच्या काही सदस्यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, यावेळी हॉटेलमधील काही सामानाचं नुकसान झाल्याचं समजतंय.

Team India : सामनाची तोडफोड आणि खेळाडूच्या रूममध्ये महिला...भारतीय खेळाडूंकडून नियमांचं उल्लंघन

Indian Team Broke Hotel Rules : क्रिकेट टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. टेस्ट सिरीजनंतर वेस्ट इंडिजविरूद्ध दुसरी वनडे खेळवण्यात येतेय. यावेळी पहिली वनडे टीम इंडियाने तर दुसरा वनडे सामना वेस्ट इंडिजने जिंकल्याने तिसरी वनडे निर्णायक ठरणार आहे. अशातच भारताच्या नेमबाजी टीमबाबत दक्षिण कोरियातून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलीये. यावेळी भारताच्या काही सदस्यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय. 

टीमच्या सदस्यांकडून नियमांचं उल्लंघन?

भारतीय नेमबाजी दलातील काही सदस्यांनी अलीकडेच चांगवॉनच्या 3ऱ्या जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपदरम्यान हॉटेलच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेबाबत भारतीय टीमसोबत असलेल्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती दिली. या माहितीनुसार, एक महिला नेमबाज पुरुष शूटरच्या खोलीत शिरताना दिसली. हॉटेलच्या रिसेप्शनवरून याची माहिती मिळाली. 

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, यावेळी हॉटेलमधील काही सामानाचं नुकसान झाल्याचं समजतंय. तो अधिकारी म्हणाला "आम्ही स्वतंत्रपणे घटनेची पडताळणी करू शकलो नाही. कारण कोणीही महिलेला खोलीत प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना पाहिले नाही. याशिवाय हॉटेलने खोल्यांमधील काही सामानाचं नुकसान झाल्याचंही म्हटलंय. दरम्यान याबाबत त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

अधिकाऱ्याने पुढे माहिती दिली की, “ज्या नेमबाजांबद्दल तक्रार करण्यात आली ते शॉटगन शूटर आहेत. मुख्य म्हणजे हे त्याठिकाणी स्वतःच्या खर्चाने गेले होते. चौकशी केली असता आम्हाला समजलं की, महिलेने पुरुष शूटरच्या वॉशरूमचा वापर केला होता. इतकंच नव्हे तर 'इलेक्ट्रिक केटल'मध्ये नूडल्स बनवून ते बिघडवल्याचंही समोर आलंय.

24 जुलै रोजी दक्षिण कोरियाच्या चांगवॉन शहरात झालेल्या या स्पर्धेसाठी भारताने मोठी टीम पाठवली होती. यामध्ये 6 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

Read More