Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

फिल्मी आहे सुनील छेत्रीची लव्ह स्टोरी, करिअर पणाला लावत थेट प्रशिक्षकाच्या मुलीलाच केला होता प्रपोज

Sunil Chhetri Love Story: सैफ चॅम्पियनशिप 2023 (saff championship) च्या अंतिम सामन्यात भारताने कुवैतचा पेनाल्टी शूटआऊटमध्ये 5-4 ने पराभव करत जेतेपद जिंकलं आहे. कर्णधार सुनील छेत्रीच्या (Sunil Chhetri) नेतृत्वातील भारतीय संघासाठी हा दुसरा मोठा विजय आहे. याचवर्षी भारतीय संघ लेबनानचा पराभव करत इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनमदेखील झाला आहे.    

फिल्मी आहे सुनील छेत्रीची लव्ह स्टोरी, करिअर पणाला लावत थेट प्रशिक्षकाच्या मुलीलाच केला होता प्रपोज

Sunil Chhetri Love Story: सैफ चॅम्पियनशिप 2023 (Saff Championship) च्या अंतिम सामन्यात भारताने कुवैतचा पेनाल्टी शूटआऊटमध्ये 5-4 ने पराभव करत जेतेपद जिंकलं आहे. भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदान खचाखच भरलं होतं. या रोमांचक सामन्यात सुनील छेत्रीची (Sunil Chhetri) पत्नी सोनम भट्टाचार्यदेखील पोहोचली होती. सोनम याआधीही अनेकदा आपला पती आणि भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित रहिली होती. दरम्यान, अंतिम सामना जिंकल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता. विशेष म्हणजे, सोनम लवकरच आई होणार असून गर्भवती असतानाही ती मैदानात सुनील छेत्रीला पाठिंबा देण्यासाठी हजर होती. 

2017 मध्ये सोनम आणि सुनील विवाहबंधनात अडकले. याआधी 13 वर्षं त्यांनी एकमेकांना डेट केलो होतं. सुनील आणि सोनम यांची लव्ह स्टोरी कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. कारण सोनम ही सुनील छेत्री याचे प्रशिक्षक सुब्रतो भट्टाचार्य यांची मुलगी आहे. सुनील छेत्री एकेकाळी सुब्रतो भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली अंडर मोहन बागानमध्ये खेळत होता. 

सुनील छेत्रीने एका मुलाखतीत सोनमसह झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितलं होता. त्याने सांगितलं होतं की, तिचे वडील माझे प्रशिक्षक होते. त्यांच्या घरात कदाचित माझ्याबद्दल फार बोलणं होत असावं, ज्यामुळे सोनमच्या मनात माझ्याबद्दल कुतुहूल निर्माण होत अधिक जाणून घेण्याची ओढ तयार झाली असाली. त्यावेळी मी 18 वर्षांचा होता आणि सोनम 15 वर्षांची होती. 

सुनील छेत्रीने सांगितलं होतं की, सोनमने वडिलांच्या मोबाइलमधून माझा नंबर चोरुन घेतला होता. त्यानंतर तिने मला मेसेज करत मी तुझी खूप मोठी चाहती असून, मला तुला भेटण्याची इच्छा आहे असं म्हटलं होतं. मला त्यावेळी ही मुलगी कोण आहे याची माहिती नव्हती. तिने इतक्या साधेपणाने विचारलं होतं की, मी तिला भेटण्यासाठी नकार देऊ शकलो नाही. 

दरम्यान, सुनील छेत्री खेळामुळे सतत प्रवासात असायचा. यामुळे त्याची आणि सोनमची जास्त भेट होत नव्हती. एका वर्षात त्यांची फक्त दोन ते तीन वेळाच भेट होत होती. यामुळे ते लपून सिनेमा हॉलमध्ये भेटत असतं. तिथेही दोघं कोणीतरी पाहील या भीतीने एकत्र जात नसत. 

अनेक वर्षांनी सुनील छेत्रीने हिंमत करुन सोनमच्या वडिलांकडे लग्नासाठी विचारणा केली होती. पण ते आपले प्रशिक्षक असल्याने तो खूप घाबरला होता. पण सुनील छेत्रीला ज्याची भीीती वाटत होती तसं काही झालं नाही. काही वेळ विचार केल्यानंतर त्यांनी लग्नासाठी होकार दिला होता. 

Read More