मुंबई : क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर भारतीय सैन्यदलासोबत काही दिवस देशाच्या संरक्षणार्थ महेंद्रसिंह धोनी काही सैन्यदलाच्या सेवेत रुजू झाला. आपली जबाबदारी आणि देशाप्रती असणारं कर्तव्य लक्षात घेत त्याने पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने सर्वांचीच मनं जिंकली. मुख्य म्हणजे धोनी हा काश्मीरमध्ये तणावाच्या वातावरणात सैन्यदलाच्या सेवेत रुजू असला तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ मात्र व्हायरल होत आहेत.
एखाद्या व्हिडिओमध्ये धोनी सैन्यदलातील जवानांसोबत व्हॉलिबॉल खेळताना दिसतो, तर कुठे तो गाणं गाताना दिसतो. असाच एक नवा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या फोटोमध्ये तो बुट पॉलिश करताना दिसत आहे.
फोटोत दिसत असल्याप्रमाणे माही एका लहानशा खोलीमध्ये खुर्चीवर बसून, बुट पॉलिश करताना दिसत आहे. त्याचं हे रुप पाहता खऱ्या अर्थाने देशसेवेसोबत तो पुन्हा एकदा स्वयंशिस्तीचे धडे गरवत असल्याचं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहेत.
Here's The legend!#Dhoniinkashmir #dhoniinbillionhearts
— Aashu chaudhary (@Aashudhoni) August 5, 2019
The Indian youth learn from this great man.
Dear @msdhoni we all love you so much! pic.twitter.com/DASgzMUBT1
काही क्षणांतच त्याचा फोटो व्हायरल झाला असून, अनेकांनी तो शेअर करत एका नव्या निमित्तासह माहीची प्रशंसा केली आहे. दरम्यान, क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकातून दोन महिन्यांचा वेळ काढत धोनीने सैन्यदलाच्या सेवेसाठी वेळ देण्याचं ठरवलं आहे. त्याच धर्तीवर त्याने ३१ जुलैपासून ही सेवा सुरु केली. १५ ऑगस्टपर्य़ंत तो आपल्या बटालियनसोबतच राहणारआहे. २०११ मध्ये धोनी सैन्यदलाशी जोडला गेला होता. यावेळी तो पेट्रोलिंग, गार्ड आणि पोस्ट ड्युटीची जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे.