Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

काश्मीरच्या या महिला फूटबॉलरचा आदर्श आहे हा भारतीय क्रिकेटपटू

फिटनेस बद्दल जनजागृती करणाऱ्या खेळाडूंसोबत पंतप्रधान मोदींची चर्चा

काश्मीरच्या या महिला फूटबॉलरचा आदर्श आहे हा भारतीय क्रिकेटपटू

नवी दिल्ली : फिट इंडिया चळवळीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिटनेस बद्दल जनजागृती करणाऱ्या खेळाडूंसोबत आज चर्चा केली. पीएम मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि काश्मिरी फुटबॉलपटू अफशान आशिक यांच्यासह अनेक जणांशी संवाद साधला.

पीएम मोदींनी जेव्हा फुटबॉलपटू अफशान आशिकला विचारलं की, 'तुम्ही काश्मीरच्या मुलींसाठी स्टार आहात'. पीएम मोदी यांनी तिच्याकडून फिटनेस आणि सराव याबद्दल माहिती घेतली. अफशानने सांगितले की, 'सुरुवातीला तिच्या निर्णयाला कुटुंबातील सदस्यांनी पाठिंबा दर्शविला नव्हता. मग तिने मुंबईत येऊन सराव सुरु केला.'

पीएम मोदींनी अफशानला विचारले की काश्मीरमधील मुले या खेळामध्ये सर्वात पुढे का आहेत? अफशान म्हणाली की, 'तिथल्या हवामानामुळे काश्मीरमधील लोकांची तग धरण्याची क्षमता चांगली आहे. जे खेळामध्येही फायदेशीर ठरते.'

अफशान ही संघात गोलकीपर आहे. तिने म्हटलं की, 'टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर ती खूप प्रभावित आहे. कॅप्टन कूलकडून तिला खूप प्रेरणा मिळते. कठीण परिस्थितीत शांत कसे राहायचे हे त्यांच्याकडून शिकते.'

Read More