Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

वेलिंग्टनमधला इतिहास बदलण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरणार

मालिकेतील अखेरचा पाचवा सामना वेलिंग्टनच्या वेस्टपेक येथे खेळला जाणार आहे.

वेलिंग्टनमधला इतिहास बदलण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरणार

वेलिंग्टन : न्यूझीलंडकडून चौथ्या वनडेमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर आता ३ फेब्रुवारीला भारताचा या सीरिजमधला शेवटा सामना होणार आहे. चौथ्या सामन्यात अपयशी कामगिरी केलेल्या भारतीय बॅट्समनना अखेरच्या सामन्यात चांगली कामिगिरी करण्याचा प्रयत्न असेल. तसेच या सामन्यात विजय मिळवून ४-१नं मालिका जिंकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल. तर हा अखेरचा सामना जिंकत पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न न्यूझीलंडची टीम करेल. 

वेलिंग्टनचा इतिहास

मालिकेतील अखेरचा पाचवा सामना हा वेलिंग्टनच्या वेस्टपेक येथे खेळला जाणार आहे. या मैदानावरील भारतीय टीमची कामगिरी फारशी चांगली नाही. या मैदानात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांपैकी केवळ एका सामन्यातच भारताला विजय मिळवता आला आहे. तर एका सामन्यात पराभव आणि एक सामना हा अनिर्णीत राहिला होता. 

भारतीय टीमनी २००३ साली खेळलेल्या सामन्यात जहीर खानच्या नाबाद ३४ रनच्या जोरावर विजय मिळवला होता. १६८ रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय टीमनं ११६ रनवर ७ विकेट गमावल्या होत्या. भारतीय टीम अडचणीत असताना जहीर खानने नाबाद ३४ रनची महत्वपूर्ण खेळी केली करत भारताला विजय मिळवून दिला होता.

तर यानंतर २०१४ खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय टीमला पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला विजयासाठी ३०४ रनचे आव्हान दिले होते. या आव्हानाच्या मोबदल्यात भारतीय टीमला केवळ २१६ रन करता आल्या होत्या.

उद्या (३ फेब्रुवारी) होणाऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचा भारतीय टीमचा प्रयत्न असेल. चौथ्या सामन्यात भारतीय बॅट्समननी केलेली निराशा ही अपवादात्मक आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे बॅटिंग प्रशिक्षक संजय बांगर यांनी दिली आहे. भारतीय टीमच्या मधल्या फळीबद्दल प्रशिक्षक संजय बांगर यांनी विश्वास दाखवला आहे. ते म्हणाले की, भारतीय फलंदाजांनी नेहमी प्रतिकूल परिस्थिीतीत चांगली कामगिरी केली आहे.
 
संजय बांगर पाचव्या सामान्याआधी  म्हणाले की, 'भारताच्या मधल्या फळीने अनेक वेळा चांगली कामगिरी केला आहे. काही अपवादात्माक परिस्थिती वगळता भारताच्या मधल्या फळीतील बॅट्समननी चांगली कामगिरी केली आहे. जेव्हा टीम अडचणीत असते, त्यावेळी मधली फळी चांगली कामगिरी करत, आपला विश्वास सार्थ ठरवते. चौथा सामना भारतीय टीमसाठी निराशाजनक ठरला. भारतीय टीमला या सामान्यात चांगला खेळ करता आला नाही. पण आता हे झालेलं विसरुन आपल्याला पाचव्या सामन्याकडे लक्ष द्यायला हवे असे'. 

प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी मिळावी यासाठी भारताच्या टीम प्रशासनाकडून टीममध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती संजय बांगर यांनी दिली.

Read More