Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पहिल्या टी-20मध्ये भारताचा दणदणीत विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा २८ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.

पहिल्या टी-20मध्ये भारताचा दणदणीत विजय

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा २८ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे. भारतानं ठेवलेल्या २०४ रन्सचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून १७५ रन्सपर्यंत मजल मारता आली. भारताकडून भुवनेश्वर कुमारनं ५ विकेट्स घेतल्या तर जयदेव उनाडकट, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं. दक्षिण आफ्रिकेच्या रिझा हेंड्रिक्सनं सर्वाधिक ७० रन्स केल्या. भुवनेश्वर कुमारनं ४ ओव्हरमध्ये २४ रन्स देऊन ५ विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमारची टी-20 क्रिकेटमधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या विजयाबरोबच भारतानं ३ टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतली आहे. 

या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. भारतानं २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून २०३ रन्सचा डोंगर उभारला. भारताचे ओपनर रोहित शर्मा आणि शिखर धवननं फटकेबाजी करुन भारताला चांगली सुरुवात करुन दिली. रोहित शर्मा ९ बॉल्समध्ये २१ रन्स करुन आऊट झाला. तर धवननं ३९ बॉल्समध्ये ७२ रन्स केल्या.

भारतीय टीममध्ये कमबॅक करणाऱ्या सुरेश रैनाला ७ बॉल्समध्ये १५ रन्स करण्यात आले. विराट कोहली २६ रन्सवर आणि धोनी १६ रन्सवर आऊट झाला. मनिष पांडे २९ रन्सवर आणि हार्दिक पांड्या १३ रन्सवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेच्या ज्युनिअर डालानं सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर क्रिस मॉरिस, तरबेज शम्सी आणि पेहलुक्वायोला प्रत्येकी १ विकेट मिळाली.

Read More