Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs AFG : टीम इंडियाची अफगाण मोहिम 'यशस्वी', शिवम दुबेचा जलवा; दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने दमदार विजय!

India vs Afghanistan 2nd T20I : यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुवम दुबे (Shivam Dube) यांच्या आक्रमक खेळीमुळे अफगाणिस्तानने दिलेलं 173 धावांचं आव्हान टीम इंडियाने आराम पूर्ण केलं.

IND vs AFG : टीम इंडियाची अफगाण मोहिम 'यशस्वी', शिवम दुबेचा जलवा; दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने दमदार विजय!

India Win Afghanistan T20I Series : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG 2nd T20I) यांच्यात खेळवल्या गेलेल्या इंदोरच्या होळकर मैदानावर टीम इंडियाने दमदार विजय मिळवला आहे. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुवम दुबे (Shivam Dube) यांच्या आक्रमक खेळीमुळे अफगाणिस्तानने दिलेलं 173 धावांचं आव्हान टीम इंडियाने आराम पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली फेल ठरल्यानंतर देखील युवा खेळाडूंनी दम दाखवल्यामुळे भारताने मालिकेवर कब्जा देखील मिळवला आहे.

टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानच्या टीमला मोठी धावसंख्या खेळता आली नाही. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने 200 हून अधिकचं आव्हान मिळेल, अशी शक्यता होती. अशातच अर्शदीप सिंग आणि फिरकीपटूंनी अफगाणी फलंदाजांचा टप्प्यात कार्यक्रम केला. गुलबदिन नायब याने एक बाजू लावून धरली पण अक्षर पटेलच्या जाळ्यात तो अडतलाय त्यानंतर अफगाणिस्तानच्या शेपटाने झुंज दिली मात्र, अर्शदीपने धावा आवळल्या अन् अफगाणला 172 वर रोखलं. त्यानंतर टीम इंडियाचा म्होरक्या रोहित शर्मा यशस्वी जयस्वालला मैदानात घेऊन आला. 150 वा टी-ट्वेंटी सामना खेळत असलेला रोहित शर्मा पहिल्याच बॉलवर बोल्ड झाला. त्यानंतर विराट कोहलीने काही वेळ तग धरला पण नवीन उल हकला फटकवण्याच्या नादात विराट बाद झाला. त्यानंतर शिवम दुबेने मागील सामन्याप्रमाणे धमाकेदारी खेळी केली अन् अखेरपर्यंत मैदानात पाय रोवून उभा राहिला. रिंकू सिंहने नेहमीप्रमाणे फिनिशिंग केली अन् मालिका खिशात घातली.

टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल याने 34 बॉलमध्ये 68 धावांची खेळी केली. तर शिवम दुबे याने 32 बॉलमध्ये 63 धावा फटकावल्या. तर गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये अर्शदीप सिंगने 3 विकेट्स तर अक्षर पटेल आणि रवी बिश्नोईने 2-2 विकेट्स घेतल्या. अचूक आणि भेदक गोलंदाजीमुळे अक्षर पटेल याला प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यात आला. आता बंगळुरूच्या मैदानावर येत्या 17 तारखेला दोन्ही संघात तिसरा सामना खेळवला जाणार आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन : इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानुउल्लाह गुरबाज(विकेटकीपर), अजमातुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.

Read More