Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारत-पाकिस्तान हॉकी सामना २-२ ने ड्रॉ

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिला सामना रंगला. हा सामना 2-2 ने बरोबर झाला आहे. 

भारत-पाकिस्तान हॉकी सामना २-२ ने ड्रॉ

सिडनी : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिला सामना रंगला. हा सामना 2-2 ने बरोबर झाला आहे. 

भारतीय टीमचा खेळाडू दिलप्रीत सिंहने 13 व्या मिनिटाला गोल केला. पहिल्या हाफमध्ये भारत 1-0 ने पुढे होती. भारतीय हॉकी टीम 2014 नंतर आतापर्यंत पाकिस्तानकडून पराभूत नाही झाली.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात नेहमी कांटे की टक्कर असते. पण मागच्या काही वर्षात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवले आहेत. मागच्या वर्षी आशिया कपमध्ये दोन्ही संघामध्ये सामना झाला होता. भारतीय टीमने यावेळी गोल्ड मेडल जिंकलं होतं. भुवनेश्वरमध्ये हॉकी वर्ल्ड लीगमध्ये ही भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. यावेळी भारताला कांस्य पदक मिळालं होतं.
 

Read More