Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारत- बांग्लादेश सामन्यामुळं पुण्यातील शेतकरी झाले 'लखपती'; नेमकं घडलं तरी काय?

India vs Bangladesh: एकदिवसीय क्रिकेटमध्ये आज भारत आणि बांगलादेश संघ भिडणार आहेत. पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर हा सामना होत आहे. या सामन्यामुळं पुण्यातील शेतकरी मालामाल झाले आहेत. 

भारत- बांग्लादेश सामन्यामुळं पुण्यातील शेतकरी झाले 'लखपती'; नेमकं घडलं तरी काय?

India vs Bangladesh: आयसीसी वर्ल्डकप 2023मध्ये आज भारत विरुद्ध बांगलादेश या दोन संघात लढत होणार आहे. वर्ल्डकपमधील 17 वा सामना आज पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या गुहुंजे येथील स्टेडियममध्ये होत आहे. पुण्यातील या स्टेडियमध्ये सामना होत असल्याने शेतकरी मात्र मालामाल होणार आहे. तर, स्थानिक नागरिक मात्र आजच्या सामन्यामुळं हैराण झाले आहेत. 

पुण्यातील गहुंजेमधील एमसीए स्टेडियमवर या वर्ल्डकपमधील पहिला सामना आज होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात हा सामना आज रंगणार आहे. या निमित्ताने पुण्यात तब्बल 27 वर्षांनी क्रिकेट सामने होणार आहेत. पुणे-मुंबईतून येणाऱ्या प्रेक्षकांमुळं मैदानात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. याच गर्दीमुळं गावातील शेतकरी मात्र मालामाल होणार आहेत. याचे कारण समजल्यावर तुम्हीदेखील आश्चर्य व्यक्त कराल. 

मॅच पाहण्यासाठी मुंबई-पुण्यासह देशभरातून क्रिकेटप्रेमी स्टेडियममध्ये येणार आहेत. स्वतःची कार घेऊन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंग स्थळ म्हणून शेतकऱ्यांनी त्यांची जमीन भाड्याने देण्याची व्यवस्था केली आहे. तर, काही शेतकऱ्यांनी त्यांच्या जमीनीवर पे आणि पार्क व्यवस्था सुरू केल्या आहेत. इथे कार पार्क करण्यासाठी प्रत्येकाकडून 50 ते 60 रुपये घेण्यात येतात.

एमसीए स्टेडियमने गुरुवारी सकाळपासून गहुंजे पोहोचणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे. पार्किंगसाठी त्यांनी गहुंजे आणि त्याच्या आसपासच्या गावच 42 एकर जमीन भाड्यावर घेतली आहे. शेतकऱ्यांना पाच सामन्यांसाठी एक एकर जमीनीसाठी 1 लाख रुपयांचे भाडे मिळत आहे. एमसीएमध्ये पार्किंगसाठी वेगवेगळे भाडे मिळत आहेत. ज्यांची जमीन स्टेडियमजवळ आहे त्या शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळणार आहेत. 

गहुंजे गावकरी मात्र नाराज 

गहुंजे गावकरी मात्र नाराज आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मॅच आमच्या गावात होत आहे तरीदेखील आम्हालाच तिकिटे मिळालेली नाहीत. स्टेडियममध्ये एकही तिकिट काउंटर नाहीये. गावकरी कित्येत दिवसांपासून तिकिट मिळवण्यासाठी खटाटोप करत आहेत. मात्र त्यांना तिकिटच मिळाली नाहीत. मॅचच्या एक दिवसा आधीच गावातील तरुण तिकिट मिळतील या आशेने पुन्हा स्टेडियममध्ये गेले मात्र त्यांच्या हाती निराशाच लागली. 

ग्रामपंचायतीला मिळायचे 100 तिकिटे 

या पहिले जेव्हा स्टेडियममध्ये कोणती मॅच होत असेल तर ग्रामपंचायतीला कमीत कमी 100 तिकिटे तरी मिळायचे. मात्र, आता सदस्यांकडेही तिकिटे नाहीयेत. गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे अनेक नातेवाईक आणि मित्र तिकिट मागतात. मात्र, आम्हालाच तिकिटे मिळत नाहीयेत. 

Read More