Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कोण जिंकणार वर्ल्ड कप? कशी आहे 'हिटमॅन'ची ग्रहस्थिती? वाचा ज्योतिषांची भविष्यवाणी

IND vs AUS Final Win Prediction: ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलणार की भारत या विश्वचषकाचा शेवट विजयाने करणार? यावर प्रसिद्ध ज्योतिषी पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी  भविष्यवाणी केली आहे.

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कोण जिंकणार वर्ल्ड कप? कशी आहे 'हिटमॅन'ची ग्रहस्थिती? वाचा ज्योतिषांची भविष्यवाणी

IND vs AUS Final Win Prediction: भारत-ऑस्ट्रेलियासह जगभरातील क्रिकेट चाहते रविवार, 19 नोव्हेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 2023 च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येत आहेत. टीम इंडियाचा या स्पर्धेतील प्रवास खूपच अप्रतिम राहिला आहे. टिम इंडियाने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून भारताने अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कपमधील सुरुवात निराशाजनक झाली. ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावले, पण त्यानंतर मागे वळून पाहिले नाही आणि थेट अंतिम फेरीत धडक मारली आहे. या दोन दिग्गज टिममध्ये कोण जिंकणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान ज्योतिषांनी याबद्दल महत्वाची भविष्यवाणी केली आहे. 

ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलणार की भारत या विश्वचषकाचा शेवट विजयाने करणार? यावर प्रसिद्ध ज्योतिषी पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी  भविष्यवाणी केली आहे.

पंडित जगन्नाथ गुरुजींच्या मते, जर आपण दोन्ही बाजूंच्या कुंडलींची तुलना केली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा वरचष्मा आहे. ज्योतिषांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, 'भारत आयसीसी विश्वचषक 2023 ची ट्रॉफी जिंकेल अशी सर्व शक्यता आहे'. भारताची कुंडली सध्या ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत खूपच चांगली आणि मजबूत आहे, जी भारतीय खेळाडूंना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना सामन्याच्या दिवशी पराभूत करण्यासाठी उत्साह, ऊर्जा, प्रामाणिकपणा आणि समर्पण प्रदान करेल.

'या विश्वचषकात रोहित शर्माची कुंडली सतत सुधारत आहे, ज्यामुळे त्याला त्याच्या नेतृत्व कौशल्यात मदत झाली आहे. शिवाय, रोहितची ग्रहस्थिती आणि संरेखन विश्वचषक 2011 मधील महेंद्रसिंग धोनी प्रमाणे आहे, असे भारतीय खेळाडूंबद्दल बोलताना जगन्नाथ गुरुजी सांगतात. रोहित शर्मा 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबाद येथे ICC विश्वचषक 2023 ट्रॉफी उचलून स्वतःसाठी आणि संघासाठी इतिहास रचेल, असे त्यांनी सांगितले. 

'टीम इंडियाने अतिआत्मविश्वास टाळावा'

शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या कुंडलीत बलवान युरेनस, शुक्र आणि नेपच्यून आहे. हे सर्व ग्रह वर्चस्व गाजवणार आहेत. रविवारी वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये इतिहास रचला जाऊ शकतो. असे असले तरी भारताच्या आठव्या घरात मंगळाची उपस्थिती आहे. भारतीय खेळाडूंनी त्यांच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि अतिआत्मविश्वास टाळला पाहिजे, ज्यामुळे त्यांच्यासाठी आव्हाने निर्माण होऊ शकतात, अशी ग्रहस्थिती दर्शवत असल्याचे सांगण्यात आले आहे.

टीम ऑस्ट्रेलियाची कुंडली

ऑस्ट्रेलियन कॅम्पमधील पॅट कमिन्सची कुंडली चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. जे चांगल्या ग्रहांचे संरेखन आणि नेतृत्व कौशल्याचा अवलंब दर्शवते, असे जगन्नाथ गुरुजींनी सांगितले. असे असले तरीही रोहितच्या कुंडलीशी तुलना केल्यास हिटमॅन रोहित ऑस्ट्रेलियन कर्णधाराला सर्व बाबींमध्ये मागे टाकू शकतो, असे त्यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियन टिममध्ये ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क आणि मार्नस लॅबुशेन हे खेळाडू चांगली कामगिरी करु शकतात अशी ग्रहस्थिती सांगत असल्याचे ते म्हणाले. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

Read More