Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

जेव्हा टीम इंडियाच्या कर्णधारने दक्षिण अफ्रिकेत केले महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण...

भारताने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल २६ वर्षांनतर पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यांची मालिकी जिंकली. ज्या दक्षिण अफ्रिकेच्या भूमीवर भारताने हे यश मिळवले त्या भूमिसोबत भारताचे अनोखे नाते आहे.

जेव्हा टीम इंडियाच्या कर्णधारने दक्षिण अफ्रिकेत केले महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण...

नवी दिल्ली : भारताने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल २६ वर्षांनतर पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यांची मालिकी जिंकली. ज्या दक्षिण अफ्रिकेच्या भूमीवर भारताने हे यश मिळवले त्या भूमिसोबत भारताचे अनोखे नाते आहे.

महात्मा गांधींनी सुरू केला लढा

२००३मध्ये भारताचे दक्षिण अफ्रिकेबद्धल असलेल्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा केली गेली. २००३मध्ये दक्षिण अफ्रिका, केनिया आणि झिम्बाब्वेमध्ये विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महात्मा गांधींनी वर्णव्यवस्थेविरूद्ध दिलेल्या लढ्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या उजाळ्यातून दक्षिण अफ्रिकेसोबतचे भारताचे नाते पुन्हा एकदा पुढे आले. जेव्हा पीटरमैरिट्जबर्ग येथे भारतीय कर्णधार सौरव गांगूलीने महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले.

दक्षिण अफ्रिकेत भारताचा दणदणीत विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताने ७३धावांनी दणदणीत विजय मळवला. भारताने ठेवलेल्या २७५ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे सर्व गडी २०१ धावांवार बाद झाले.  या विजयामुळे भारताने ६ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ४-१नं विजयी आघाडी घेतली आहे. २६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतानं दक्षिण आफ्रिकेत वनडे सीरिज जिंकली.

Read More